‘राम आयेंगे’ गाण्यामुळे देशात हिट झालेली नागपूरची ‘ती’ शिक्षिका कोण? तिचं नाव काय? जाणून घ्या
ram mandir pran pratishtha : 'राम आयेंगे' गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत ताल धरणारी नागपूरची 'ती' शिक्षिका कोण? तिचं नाव काय? प्रभू राम यांची प्राण प्रतिष्ठा अयोध्येत येत असल्यामुळे भारतात उत्साहाचं वातावरण
मुंबई | 22 जानेवारी 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण भारतात राममय वातावरण झालं आहे. सोमवारी अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा भव्य सोहळा रंगला आहे. तब्बल 500 वर्षानंतर राम आपल्या गर्भगृहात विराजमान होतील. या क्षणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा आज संपूर्ण देशात मोठा उत्साह दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील प्रभू राम आणि अयोध्येतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रभू राम यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांसोबत ‘राम आयेंगे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडीओचं कौतुक देखील केलं. सध्या ज्या शिक्षिकेची चर्चा रंगली आहे, त्या शिक्षिका नागपूर येथील आहेत. शिक्षिकेचं नाव काजल असुदानी आहे. काजल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
View this post on Instagram
काजल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या बाबा नायक सिंधी हिंदी विद्यालय, नागपूर या शाळेतील शिक्षिका आहेत. याआधी देखील काजल यांनी अनेक गाण्यांवर विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
काजल सोशल मीडियावर सेन्सेशन आहेत. त्यांना डान्सची आवड आहे… असं त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमुळे लक्षात येतं. काजल इन्स्टाग्रावर कायम सक्रिय असतात. इन्स्टाग्रावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्राम काजल यांना तब्बल 69.7 हजार नेटकरी फॉलो करतात. तर काजल फक्त 1.139 नेटकऱ्यांना फॉलो करतात.
काजल यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे. काजल सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. अनेक गोष्टी क्षणात जगभरात व्हायरल होतात. काजल यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.