‘Naatu Naatu’ गाण्यावर Tesla कारचा लाईट शो, इलॉन मस्क यांनी देखील कमेंट केली, पाहा व्हायरल व्हिडीओ
'आरआरआर' चित्रपटाच्या ऑस्कर विजेत्या 'नाटू नाटू' गाण्याने सध्या ग्लोबल मार्केट खाल्ले आहे. या गाण्याला ऑस्करचे नामांकन जाहिर झाल्यापासूनच जो तो या गाण्यावर नृत्य करून प्रसिद्धीतीचे शिखरावर जाऊन पोहचत आहे.
मुंबई : RRR ( आरआरआर ) चित्रपटातील ऑस्कर ( OSCAR ) विजेत्या ‘natu natu’ या गाण्याची क्रेज आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. या गाण्याला ऑस्करचे नामांकन जाहीर झाल्यापासून हे गीत विविध मंचांवर गाजत आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही ऑस्करच्या रंगमचावर हे गीत नृत्यासह सादर करण्यात आले होते. आता या गाण्याची लोकप्रियता इतकी आकाशाला भिडली आहे की संपूर्ण जगात हे गीत चर्चेचा विषय ठरले आहे. आता एक नवा व्हिडीओ सोशल मिडीयावर धूम माजवत आहे. ‘नाटू नाटू’ गाण्यावर टेस्ला ( Tesla) कारच्या धमाल व्हिडीओ पाहून इलोन ( ELON MUSK ) भाऊ देखील खूश झाले आहेत.
‘natu natu’ या गाण्याने भारतातच नाही तर जगभरात धमाल माजिवली आहे. जो तो या गाण्यावर थिरकत आहे. या व्हायरल व्हिडीओला दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर याच्या अधिकृत ट्वीटर हॅंडल वरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये अनेक टेस्ला कार न्यू जर्सीत रांगेत पार्क केलेल्या दिसत आहेत. आणि त्यांच्या हेडलाईट्स नाटू नाटूच्या गाण्यांवर थिरकत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
.@Teslalightshows light sync with the beats of #Oscar Winning Song #NaatuNaatu in New Jersey ??
Thanks for all the love. #RRRMovie @Tesla @elonmusk pic.twitter.com/wCJIY4sTyr
— RRR Movie (@RRRMovie) March 20, 2023
न्यू जर्सी येथील व्हिडीओ
ट्वीटरवर या व्हिडीओला शेअर करताना दिलेल्या कॅप्शनप्रमाणे हा व्हिडीओ अमेरिकेतील न्यू जर्सीतील आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, 94,400 लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे, यंदा ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्करच्या ओरिजनल सॉंग्ज श्रेणीत नामांकन मिळून ऑस्करही मिळाले आहे. ‘आरआरआर’ बेस्ट ओरिजनल सॉंग्ज केटगरीत ऑस्कर मिळविणारी पहिली भारतीय फिल्म ठरली आहे. नाटू गाण्याला एमएम कीरावनी यांनी संगीत दिले आहे. आणि चंद्रबोस यांनी हे गाणे लिहीले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच ‘आरआरआ’ च्या ऑफिशियल ट्वीटर हॅंडलनेही त्याला शेअर केले आहे. या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. या व्हिडीओला टेस्ला इलेक्ट्रीक कारचा मालक इलोक मस्क यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे मस्क यांनी हार्टचा इमोजीचा रिप्लाय देत रिट्वीट केले आहे.