कचऱ्यापासून बनवला चमकदार ड्रेस! मिस युनिव्हर्समध्ये सहभाग, कौतुकाचा वर्षाव
हिऱ्यासारखा चमकणारा तिचा ड्रेस सिल्क, गोल्ड किंवा सिल्व्हरच्या तारांनी सजलेला नव्हता, तर तिचा ड्रेस कचऱ्यातून तयार करण्यात आला होता.
मिस युनिव्हर्स 2023 च्या एका इव्हेंटदरम्यान मिस थायलंड 2022 ॲना सुएंगमने एक ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केला ज्यामुळे सर्वजण थक्क झाले. खरं तर हिऱ्यासारखा चमकणारा तिचा ड्रेस सिल्क, गोल्ड किंवा सिल्व्हरच्या तारांनी सजलेला नव्हता, तर तिचा ड्रेस कचऱ्यातून तयार करण्यात आला होता. मिस थायलँडचा लूक सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.
मिस थायलंडचा ड्रेस पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. कॅनच्या ब्रिज टॅबपासून बनवलेल्या झगमगत्या ड्रेसमध्ये ॲना सुंदर दिसत होती. मात्र ब्रिज टॅबच्या मधोमध स्वरोव्स्की हिरेही होते, जे ड्रेसमध्ये चारचांद लावत होते. कचऱ्याचा पुनर्वापर करून तयार केलेला हा ड्रेस पाहून काही लोकांनी मिस थायलंडला ‘गार्बेज ब्युटी क्वीन’ असंही म्हटलं. मात्र, या गोष्टी आता ॲनाला काहीही फरक पडत नाहीत.
ॲनाचे वडील कचरावेचक आहेत, तर आई रस्ता साफ करून घर चालवते. लोकांच्या कमेंटवर ॲना म्हणतात की, कोणत्या घरात आपला जन्म कसा झाला याचा विचार करण्यापेक्षा नशीब बदलण्याची ताकद तुमच्यात आहे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. बहुतांश युजर्सनी ॲनाच्या लूकचं जोरदार कौतुक केलं आहे. यासोबतच अनोख्या पद्धतीने पालकांना श्रद्धांजली दिल्याबद्दल ॲनाचं खूप कौतुक होत आहे.
View this post on Instagram
मिस युनिव्हर्स 2023 ही सौंदर्य स्पर्धा यावेळी अमेरिकेतील लुईझियाना येथील न्यू ऑर्लीयन्स येथे आयोजित केली जाणार असून, या स्पर्धेत विजेत्याचा मुकुट सध्याच्या मिस युनिव्हर्स इंडियाच्या हरनाझ संधू हिच्या हस्ते होणार आहे. 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 86 महिलांमध्ये दिविता रायचा समावेश आहे.