Thar Stunt Viral: मस्ती मस्तीत ‘थार’ गोल गोल फिरवली, पडले तंगड्या वर करून! व्हिडीओ व्हायरल, लई हसले लोकं…

काही लोक यासाठी मेहनत घेतात, तर काही लोक हास्यास्पद कृत्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. काही तर व्हिडिओवर लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालायला चुकत नाही. या व्हिडीओ मधील मुलांना तर शंभर टक्के नंतर रुग्णालयात जावं लागलं असणारे. तुम्हीच पहा का...

Thar Stunt Viral: मस्ती मस्तीत 'थार' गोल गोल फिरवली, पडले तंगड्या वर करून! व्हिडीओ व्हायरल, लई हसले लोकं...
Thar Stunt ViralImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 11:19 AM

गाड्या फिरवणे, गाड्यांवर स्टंट मारणे, गाड्या घेऊन बाहेर फिरत बसणे हा मुलांचा छंद आहे असं म्हणायला खरं तर हरकत नाही. आपण अनेक असे व्हिडीओ पाहिलेत ज्यात मुलं बाईकवर स्टंट (Stunt On Bike) मारत असतात. असे व्हिडीओज व्हायरल व्हायरल सुद्धा होतात. आता अजून एक वाढीव व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय. हा व्हिडीओ वाढीव का आहे? कारण यात जो स्टंट करण्यात आलाय तो बाईकवर नाही, थार (Thar Stunt Video) वर करण्यात आलाय. चक्क थार! सोशल मीडियाचं स्टारडम असं आहे की, इथे प्रत्येकालाच लोकप्रिय व्हायचं असतं. काही लोक यासाठी मेहनत घेतात, तर काही लोक हास्यास्पद कृत्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. काही तर व्हिडिओवर लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालायला चुकत नाही. या व्हिडीओ मधील मुलांना तर शंभर टक्के नंतर रुग्णालयात जावं लागलं असणारे. तुम्हीच पहा का…

तंगड्या वर करून पडले

बरोबर आहे की आयुष्यात साहस आवश्यक आहे, पण त्यासाठी हाडं मोडणे कितपत योग्य आहे? चित्रपटांतील अप्रतिम स्टंट्स पाहून असं काही तरी करावंसं कुणाला वाटत नाही, पण सिनेमांमध्ये कलाकार कोणताही स्टंट मोठ्या काळजीनं करतात. पण आजकाल लोक विचार न करता स्टंट करू लागतात. आता ही क्लिप बघा, मजेशीर-मस्तीचे स्टंट केले जात होते, पण शेवटी त्यांच्या स्टंटमुळे तेच तंगड्या वर करून पडले. व्हिडिओमध्ये अनेक जण थारवर बसून भरधाव वेगाने मैदानाच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. एक-दोन फेऱ्या आरामात मारल्या जातात, पण तिसरी फेरी सुरू होताच. गाडीचा तोल ढासळतो आणि त्यावर बसलेले सगळे लोक वाईट पद्धतीने पडतात. क्लिप पाहून या अपघातात अनेक तरुण जखमी झाल्याचं दिसतंय.

धोकादायक स्टंट आपण टाळले पाहिजे

हा व्हिडिओ पाहून लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगितले की, स्टंट करण्यात लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. त्याचवेळी आणखी एका युझरने असे धोकादायक स्टंट आपण टाळले पाहिजेत, असे म्हटले आहे. दुसऱ्याने लिहिले, ‘पुढच्या वेळी स्टंट करण्याआधी हा अपघात लक्षात ठेवा.’

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.