ऐकावं ते नवलच! “मंत्री महोदय, मी आणलेली दारू चढलीच नाही!” दारूड्याची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

आपण दारूच्या नशेत असल्यामुळे दुकानातून भेसळयुक्त दारू विकण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून त्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.

ऐकावं ते नवलच! मंत्री महोदय, मी आणलेली दारू चढलीच नाही! दारूड्याची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 6:40 PM

मुंबई : आपल्या आजूबाजूला काही घडलं ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असेल.ज्यामुळे आपल्या आरोग्यावर आपल्या जीवनावर परिणाम होणार असेल, तर त्याची तक्रार बऱ्याचदा संबंधित अधिकाऱ्याकडे अन्यथा थेट मंत्र्यांकडे (Minister)  केली जाते. त्यावर तोडगा निघाल्याचंही आपण अनेकदा पाहतो. पण दारू चढत नाही म्हणून कुणी तक्रार केल्याचं कधी ऐकलं आहे का? नसेल तर ही बातमी मन लावून वाचा… एका दारूड्याने त्याने आणलेली दारू त्याला चढली नसल्याची ( alcohol Not effective) तक्रार केलीय, तीही थेट मंत्रिमहोदयांकडे…!

मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या एका 42 वर्षीय व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ती तक्रार आहे दारू संदर्भातली… दारू चढली नाही म्हणून त्याने चक्क मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आपण दारूच्या नशेत असल्यामुळे दुकानातून भेसळयुक्त दारू विकण्यात आली असल्याचं तक्रादाराचं म्हणणं आहे. या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून त्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. उज्जैनमधल्या बहादूर गंज भागात राहणाऱ्या लोकेश सोठिया यांनी ही तक्रार केली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि उज्जैनचे उत्पादन शुल्क आयुक्त इंदर सिंग डामोर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

“मी 12 एप्रिलला एका दुकानातून देशी दारूच्या चार सीलबंद बाटल्या खरेदी केल्या. मी आणि माझा मित्र त्या दोन बाटल्यांमधून दारू प्यायलो, पण ती दारू चढली नाही”, अशी तक्रार लोकेश सोठिया यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, “मी अजून दोन बाटल्यांचं सील उघडलेलं नाही आणि आवश्यक असेल तेव्हा ते पुरावे म्हणून सादर करेन. खाद्यपदार्थ, तेल आणि इतर गोष्टींमध्ये भेसळ होत असल्याचं आपल्याला माहित आहे. पण आता तर दारूमध्येही भेसळ होत आहे. हे बरोबर नाही. मी ग्राहक मंचात जाईन.”

मी मागच्या कितीतरी वर्षांपासून दारू पितो . त्यामुळे त्याची चव आणि दर्जा मला चांगलाच ठाऊक आहे. मला विकल्या जाणाऱ्या या भेसळयुक्त दारूबद्दल मी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि उज्जैनचे उत्पादन शुल्क आयुक्त इंदर सिंग डामोर यांच्याकडे तक्रार केली आहे,” असं सोथिया यांनी सांगितलं आहे.

याबाबत उत्पादन शुल्क आयुक्त इंदरसिंग डामोर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तपासात जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल”

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.