वा! मित्र असावा तर असा; ‘या’ दोन मित्रांचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
अंध व्यक्तींना (Blind person) त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना तोंड कान नाक असते. ते तोंडाने बोलू शकता, कानाने ऐकू शकतात. मात्र डोळ्याने (Eyes) पाहू शकत नाहीत. डोळ्याने दिसत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एका अंध व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Viral video : अंध व्यक्तींना (Blind person) त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना तोंड कान नाक असते. ते तोंडाने बोलू शकता, कानाने ऐकू शकतात. मात्र डोळ्याने (Eyes) पाहू शकत नाहीत. डोळ्याने दिसत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अगीदी छोट्या -छोट्या गोष्टींसाठी देखील त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यांचे जीवन हे परवलंबी बनते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये अनेकजण मार्ग काढतात. अंध व्यक्तींना देखील काही गोष्टी आवडत असतात. मात्र ते त्या गोष्टींचा डोळ्याने पाहून आनंद घेऊ शकत नाही. त्यांना फक्त त्या गोष्टींचे ऐकूनच समाधान घ्यावे लागते. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Viral video) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अंध व्यक्ती क्रिकेट पहाण्यासाठी ग्राऊंडवर आला आहे. मात्र त्याला दिसत नसल्यामुळे तो क्रिकेटचा आनंद घेऊ शकत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्याचा मित्र त्याच्या मदतीला धावून आला आहे. त्याचा मित्र त्याला तिथे ग्राऊंडवर काय घडत आहे याची माहिती देताना दिसत आहे.
व्हिडीमध्ये नेमके काय?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन मित्र मैदानात मॅच पाहात आहेत. मात्र यातील एक मित्र हा अंध आहे. तो कानाने ऐकू तर शकतो. परंतु तो आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. अशावेळी त्याचा मित्र त्याच्या मदतीला धावून आला आहे. त्याचा मित्र त्याला मॅचमध्ये काय घडत आहे. कोण खेळत आहेत याची माहिती देत आहे. हे दोनही मित्र अशा पद्धतीने क्रिकेटचा आनंद घेत आहेत. डोळे नसतानाही हा अंध वक्ती केवळ आपल्या मित्राच्या मदतीने या मॅचला आनंद घेत आहे. हा व्हिडीओ पहिल्यानंतर आज काल अशी मैत्री फार कमी पहायला मिळते अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर युजर्स देत आहेत.
मित्र असावा तर असा
हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू कबरा यांनी आपल्या ट्विटर वरून शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला एक समर्पक असे कॅप्शन देखील दिले आहे. एक अंध व्यक्ती मॅच पाहू शकत नाहीये. मात्र त्याचा मित्र त्याला मैदानात काय घडत आहे, याबद्दल माहिती देत असून दोघेही मॅचचा आनंद घेत आहेत. मित्र असावा तर असा असे कॅप्शन दिपांशू यांनी या व्हिडीओ दिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हयरल होत असून, याला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे.
दृष्टिहीन व्यक्ति मैच नहीं देख सकता था. इसलिए उसका मित्र मैच का आँखों-देखा हाल सुनाता गया. उन्हें मिलकर जीत का जश्न मनाते देख दिल खुश हो गया.
ईश्वर ऐसा दोस्त सभी को दे… pic.twitter.com/AhwVChtnSY
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 8, 2022
संबंधित बातम्या
देव तारी त्याला कोण मारी! पहा ट्रेनच्या धडकेत जेसीबी चालक कसा वाचला; व्हिडीओ व्हायरल
VIDEO | रणवीर सिंगच म्हणतो ही तर छोटी दीपिका, ‘रामलीला’तील भन्नाट डायलॉग व्हायरल