“…आणि हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ह्यांचं ब्रेकअप झालं असेल” असा अंदाज लावायला हरकत नाही!
पावसाळ्यात मजेदार किस्से घडतात आणि ते व्हायरल होतात. कुणी पाण्यातच काय पडतंय, कुणी घसरून काय पडतंय. एकसे बढकर एक किस्से!
पावसाळ्यात (Rainy Season)भारतातील रस्त्यांची काय अवस्था होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कधी रस्ते पाण्याने भरलेले असतात तर कधी चिखल पसरतो. अशावेळी रस्त्यावर धावणारी वाहने (Vehicles) अनेकदा घसरून पडतात किंवा खराब होताना दिसतात. अपघात तर रोजच होतात. पावसाळ्यात मजेदार किस्से घडतात आणि ते व्हायरल होतात. कुणी पाण्यातच काय पडतंय, कुणी घसरून काय पडतंय. एकसे बढकर एक किस्से! हा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय जो जबरदस्त आहे. ही घटना झाल्यावर त्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं काय झालं असेल पुढे हे माहित नाही पण आपण मात्र हसून हसून बेजार होतो.
या व्हिडीओमध्ये रस्त्यावर स्कुटी खराब झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसाच्या पाण्यात घाण होण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी एका मुलाची गर्लफ्रेंड स्कुटीवरून खाली उतरणं टाळते.पण त्यानंतर पुढे जे होतं याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही.
सर्वात आधी व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडिओ पाहा…
View this post on Instagram
स्कूटी सुरू करण्याचा प्रयत्न करताना प्रियकराचा तोल जातो आणि स्कुटी गुडघ्या इतक्या पाण्यात पडते. स्कुटीबरोबरच त्यावर बसलेली त्याची गर्लफ्रेंड त्या पाण्यात पडते. पावसाच्या घाणेरड्या पाण्यात भिजते.
या व्हिडिओवर कमेंट करताना लोकं, गर्लफ्रेंडला धडा शिकवला जावा म्हणून मुलाने मुद्दाम असं केलं असावं, असं ,म्हणतायत.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत तो 20लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.
इतकंच नाही तर या व्हिडिओला लाखो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाईकही केलं आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसतायत.