VIDEO | नवरीच्या आई-वडीलांनी लग्नात “आती क्या खंडाला” गाण्यावर केला जबरदस्त डान्स, व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर…
मुलीच्या लग्नात आई-वडिलांनी आनंदाच्या वातावरणात जोराचा डान्स केला आहे. हे पाहून अनेकांना आनंद झाला आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ एका लग्नातील (Wendding video) आहे. त्या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीच्या आई-वडिलांनी जोराचा डान्स केला आहे. नवरीच्या आई-वडिलांनी ज्या गाण्यावर डान्स केला आहे. ते गाणं 1998 अधिक प्रसिद्धीस आलं होतं. गुलाम (Gulaam) या चित्रपटातील ते गाणं असून त्यामध्ये अमीर खान आणि राणी मुखर्जीने डान्स केला होता. विशेष म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांना अमीर खान आणि राणी मुखर्जी यांच्या डान्सची आठवण झाल्याचं त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे.
इंन्स्टाग्रामवरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका नवरीचे आई-वडिल अमिर खानच्या गाण्यावर जोरात डान्स करीत आहेत. “आती क्या खंडाला” या गाण्यावर डान्स केल्यामुळे तो डान्स अनेकांना आवडला आहे. नवरीच्या आई-वडिलांनी चांगले कपडे घातले आहेत. त्याचबरोबर त्यांनी “कभी खुशी कभी गम” चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर चित्रित केलेले मॅशअप “आती क्या खंडाला” या शैलीत या जोडप्याचा डान्स . या दोघांनीही राणी मुखर्जी आणि आमिर खान यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्यावर मजेशीर डान्स केला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ मीडियावर अनेक लोकांना आवडला आहे. अनेक पै-पाहुण्यांनी त्या लग्नात जोराचा डान्स देखील केला आहे. लग्नात उपस्थित असलेली लोकं सुध्दा त्यांना चीयर्स करीत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत 3.8 लाख लोकांनी त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 19 हजार लोकांना हा डान्स व्हिडीओ आवडला आहे. सोशल मीडियावर लग्नातील डान्स केलेले अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, त्याचबरोबर लोकांना आवडतात. लग्नातील अनेक व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.