Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : तुम्हाला फोडता येतील का असे फुगे? 20 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ 10 सेकंदांचा Video

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर आव्हानात्मक व्हिडिओंची संख्या कमी नाही. चॅलेंज(Challenge)चे म्हणजेच एखादा खेळ (Game) असेल तर त्याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात अपलोड होत असतात. त्याला यूझर्स चांगली पसंती देतात. एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय.

Viral : तुम्हाला फोडता येतील का असे फुगे? 20 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेलाय 'हा' 10 सेकंदांचा Video
फुगे फोडण्याचा खेळ खेळणारी दोन मुलं
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 2:04 PM

Game Challenge : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर आव्हानात्मक व्हिडिओंची संख्या कमी नाही. इथं रोज असंख्य व्हिडिओ अपलोड होत असतात. मग यूझर्सना आवडले की ते शेअर होतात. विनोदी व्हिडिओ यात वरच्या क्रमांकावर आहेत. त्यासोबतच चॅलेंज(Challenge)चे म्हणजेच एखादा खेळ (Game) असेल तर त्याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात अपलोड होत असतात. त्याला यूझर्स चांगली पसंती देतात. अलिकडेच अशा आव्हानात्मक खेळावर आधारित स्क्विड गेम ही वेब सिरीज तुम्ही पाहिली असेलच. मात्र ती तर जीवघेणी होती. आव्हान पूर्ण करा नाही आपला प्राण गमवा, अशी ती संकल्पना होती. मात्र हलके-फुलके व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतोच. त्याच प्रकारातला एका खेळाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय, जो तुम्हाला नक्की आवडेल.

दोन स्पर्धक

व्हिडिओमध्ये आपल्याला दोन मुलं दिसतायत. सुरुवातीला ते काऊंटडाऊन करतात. मग काऊंटडाऊन झालं की खेळाला सुरुवात होते. खेळ असतो फुगे फोडण्याचा. पण हे फुगे फोडणं सोपं नाही बरं का? दोघांच्याही समोर सरळ रेषेत जवळपास 9 फुगे ठेवलेले आहेत. हे फुगे जमिनीवर ठेवलेले आहेत. त्याला कशाचाही आधार नाही. म्हणून ते खरं चॅलेंज आहे. आता हे फुगे पायानं फोडायचे आहेत. मग दोघंही तयार होतात आणि आपल्या पायानं फुगे फोडायला लागतात. दोन स्पर्धकांमध्ये एकाचा नेम चुकतो आणि फुगा भलतीकडेच जातो. तर दुसरा मात्र सर्व फुगे फोडतो.

यूट्यूबवर अपलोड

फुगे फोडायचे आणि समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसायचे म्हणजे थोडक्यात खुर्ची मिळवायची, असा हा खेळ असतो. यात पहिला मुलगा जिंकतो. केवळ 10 सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. Jojo Sim या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 4 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 20,428,582+ व्ह्यूज आहेत. तर Pop The Balloon Challenge! अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलीय. यूझर्सच्या कमेंट्सही पाहायला मिळतायत. (Video Courtesy – Jojo Sim)

Animal Jugaad : शेळी आणि गाढवाचा अनोखा जुगाड? टीमवर्क पाहून म्हणाल, कोणतंही काम अवघड नाही! Video Viral

Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स

Viral : दिवसभर मास्क घालून दमछाक होतेय? कोरियन कंपनीनं बनवलाय Unique Mask!

औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल
औरंगजेब इथ गाडला असा बोर्ड लावा, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावल.
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ
बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ.
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.