चिमुकल्याच्या डोक्यात कुकर अडकला, अनेक तासांची मेहनत, शेवटी मशीनने कुकर कापला!

लहान मुलांना खेळण्यासाठी स्वयंपाक घरातील वस्तू आवडतात. मग ते स्वयंपाक घरातील चमच्या, पॅन असो किंवा कुकर लहान मुलांचे हे आवडतीचे खेळणे असतात. आग्रा येथील खाती पाडा परिसरात एक दीड वर्षाचे बाळ कुकरसोबत खेळत असताना त्याच्या डोक्यात अचानक कुकर अडकले. 

चिमुकल्याच्या डोक्यात कुकर अडकला, अनेक तासांची मेहनत, शेवटी मशीनने कुकर कापला!
लहान मुलाचे डोके कुकरमध्ये अडकले
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 11:17 AM

मुंबई : लहान मुलांना खेळण्यासाठी स्वयंपाक घरातील वस्तू आवडतात. मग ते स्वयंपाक घरातील चमच्या, पॅन असो किंवा कुकर लहान मुलांचे हे आवडतीचे खेळणे असतात. आग्रा येथील खाती पाडा परिसरात एक दीड वर्षाचे बाळ कुकरसोबत खेळत असताना त्याच्या डोक्यात अचानक कुकर अडकले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. (The child head stuck in the pressure cooker, the pressure cooker was removed after the doctor’s efforts)

दोन तासांच्या मेहनतीनंतर डॉक्टरांच्या टीमने कुकरला ग्लायडरने कापून बाळाच्या डोक्यातील कुकर अखेर काढले. या लहान मुलांचे नाव हसन रझा असे आहे. हे बाळ आपल्या आईसोबत आग्राला आपल्या आजोळी आले होते आणि त्याचवेळी हा प्रकार घडला. बाळ रडत असल्यामुळे त्याला खेळण्यासाठी कुकर देण्यात आले होते. मात्र, खेळत-खेळत हे कुकर बाळाच्या डोक्यामध्ये कसे गेले हे त्याच्या घरच्यांना कळालेच नाही.

जेंव्हा बाळ रडायला लागले तेंव्हा घरच्यांचा घडलेल्या प्रकार लक्षात आला. सुरूवातील घरातील सदस्यांनी बाळाच्या डोक्यातून कुकर काढण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. मात्र, कुकर काही निघालेच नाही. त्यानंतर घरातील सदस्यांनी अखेर डाॅक्टरांकडे बाळा नेले. बाळाच्या डोक्यातून कुकर काढण्यासाठी अनेक प्रयत्न डॉक्टरांनी केले. सुरुवातीच्या प्रयत्नात बाळाचे डोके कुकरमधून बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरांनी प्रयत्न केला.

पण नंतर डॉक्टरांनी ग्लायडर मशीन मागवले. यानंतर कुकर हळू हळू कापले. डॉक्टर फरहत खान यांनी सांगितले की बाळ खूप अस्वस्थ होते. त्याचे डोके कुकरच्या आत अडकले होते, ज्यामुळे त्याला भूल देणे देखील शक्य नव्हते. जेव्हा कुकर ग्लायडर मशीनने कापला जात होता, तेव्हा बाळ खूप घाबरले होते. मात्र, दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाळाचे डोके अखेर कुकरच्या बाहेर काढले गेले.

त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की, आता बाळाची प्रकृती ठीक आहे. त्याला घरी पाठवण्यात आले आहे. या घडलेल्या प्रकारामध्ये सर्वात विशेष म्हणजे डाॅक्टरांनी जवळपास दोन तास बाळाच्या डोक्यातून कुकर काढण्यासाठी प्रयत्न केला आणि कुकर काढले देखील. मात्र, चिमुकल्याच्या घरची गरीब परिस्थिती बघून डाॅक्टरांनी यासाठी एक रूपयाही फी घेतले नाही.

संबंधित बातम्या : 

Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

Video | टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसून समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी, पण मध्येच लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं

Video | रस्त्यावर, पुलावर पाणीच पाणी, बसचे झाले जहाज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(The child head stuck in the pressure cooker, the pressure cooker was removed after the doctor’s efforts)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.