दारू पिऊन फोटो शूट करणं अंगाशी!, ‘टायटॅनिक’ पोज देताना जोडपं समुद्रात पडलं, पुढे काय घडलं पाहा…

| Updated on: May 19, 2022 | 1:05 PM

कोकालीमध्ये ही घटना घडली आहे. 'टायटॅनिक पोज' देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याचा तोल गेला आणि ते समुद्रात पडले. या घटनेत त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. तर त्याच्या गर्लफ्रेंडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दारू पिऊन फोटो शूट करणं अंगाशी!, टायटॅनिक पोज देताना जोडपं समुद्रात पडलं, पुढे काय घडलं पाहा...
Follow us on

मुंबई : सध्या फोटोशूट करण्याचा नवा ट्रेंड आलाय. अनेक जोडपी वेगवेगळ्या ठिकाणी जात फोटोशूट करत असतात. काहीजण त्यासाठी समुद्रात बोटिंगसह फोटोशूटचा पर्याय निवडतात. पण यात काही वेळा अपघात होतात. तुम्हाला ‘टायटॅनिक’ चित्रपटातील सिग्नेचर पोझ आठवतेय का? असाच टायटॅनिक फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका जोडप्यासोबत अपघात घडला आहे. जॅक आणि रोज अशी या दोघांची नावं आहेत. हे जोडपं टायटॅनिक पोजमध्ये (Titanic Pose) फोटो काढण्यासाठी गेले होते. जहाजाच्या एका टोकाला दोन्ही हात पसरून दोघे उभं होते. पण त्यांच्यासोबत अपघात झाला. दारूच्या नशेत असल्याने दोघेही समुद्रात पडले. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा (Viral News) होतेय.

कोकालीमध्ये ही घटना घडली आहे. ‘टायटॅनिक पोज’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याचा तोल गेला आणि ते समुद्रात पडले. या घटनेत त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. तर त्याच्या गर्लफ्रेंडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

23 वर्षीय फुरकान इफ्त्सी आणि त्याची गर्लफ्रेंड माइन दिनार 16 मेला रात्री उशिरा मरीना पोर्टवर मासेमारी करत होते. थोड्याच वेळात हे जोडपं समुद्राजवळ टायटॅनिक पोझ देण्यासाठी बोटवर चढले. अन् फोटोशूट करताना त्यांचा तोल जाऊन ते समुद्रात पडले. आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला फिशिंग रॉडने ओढून बाहेर काढले. दिनार बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. दीड तासाच्या शोधानंतर सुरक्षा दलांना फुरकान सिफ्ट्सीचा मृतदेह सापडला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

‘टायटॅनिक’ पोज

‘टायटॅनिक’ या हॉलिवूड चित्रपटातील एक पोज प्रचंड प्रसिद्ध आहे.ज्यात बोटीच्या टोकावर उभं राहून दोन्ही हात पसरून मागच्या बाजूने फोटो काढला जातो. असाच टायटॅनिक फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका जोडप्यासोबत अपघात घडला आहे. जॅक आणि रोज अशी या दोघांची नावं आहेत. हे जोडपं टायटॅनिक पोजमध्ये फोटो काढण्यासाठी गेले होते. जहाजाच्या एका टोकाला दोन्ही हात पसरून दोघे उभं होते. पण त्यांच्यासोबत अपघात झाला. दारूच्या नशेत असल्याने दोघेही समुद्रात पडले.