Zerodha : जावाई तर अब्जाधीश, सासरेबुवा चालवितात किराणा दुकान, सुखी-समाधानाची ही सांगितली व्याख्या
Zerodha : जावाई अब्जाधीश असला तरी अद्याप ही किराणा दुकान चालविणाऱ्या या सासरेबुवांनी सुखी-समाधानी आयुष्याचा मूलमंत्र सांगितला..त्यांचा हा मोलाचा सल्ला आणि त्यांचा साधेपणा सध्या चर्चेत आहे.
नवी दिल्ली : जीवनात सर्वकाही पैसा नसतोच. पैशांनी आनंद पण खरेदी करता येत नाही. अब्जाधीश व्यावसायिक नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी त्यांच्या सासऱ्यांचे हे विचार, त्यांच्या फोटोसह सोशल मीडियावर शेअर करताच लाईक्सचा पाऊस पडला. नितीन कामथ यांचे सासरे आजही छोटीशी किराणा दुकान चालवितात. जावाई, मुलगी श्रीमंत असतानाही त्यांनी सुखी जीवनाचा आनंद कशात आहे, हे आचारणातून दाखवून दिले. श्रीमंती, पैसा, दौलत, प्रसिद्ध यापासून काही लोक चार हात दूर राहतात, नितीन कामथ यांचे सासरे शिवाजी पाटील (Shivaji Patil) हे पण त्यातील एक आहेत. त्यांनी कधीच देखावा केला नाही की, त्यांचा जावाई झिरोधा (Zerodha) सारख्या कंपनीचा मालक आहे, मुलगी उद्योजिका आणि श्रीमंत आहे.
फोटो केला शेअर नितीन कामथ यांनी सासऱ्यांच्या छोट्या किराणा दुकानातील फोटो शेअर केला. त्यात सासरे शिवाजी पाटील, नितीन कामथ आणि एक छोटा मुलगा दिसत आहे. बेळगावमध्ये त्यांचे हे छोटे किराणा दुकान आहे. नितीन कामथ हे समोर बसलेले आहेत. तर सासरे दुकानात उभे आहेत. आपल्याकडे असते असेच हे छोटेखानी किराणा दुकान आहे.
कोण आहेत शिवाजी पाटील नितीन कामथ यांचे सासरे शिवाजी पाटील हे भारतीय सैन्यात होते. कारगिल युद्धात त्यांना हाताची बोटे गमवावी लागली. त्यानंतर त्यांनी सैन्यातून निवृत्ती स्वीकारली. लष्करातून निवृत्तीनंतर त्यांनी बेळगावमध्ये किराणा दुकान सुरु केले. आज ते 70 वर्षांचे आहेत, पण ते कामात मग्न असतात. या किराणा दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दुकानात सामान, किराणा माल आणण्यासाठी त्यांच्याकडे जुनी स्कूटर आहे.
Being content is the only way to true freedom. A person who embodies this is my father-in-law, Shivaji Patil He was in the Indian Army & voluntarily retired as a Havaldar after losing his fingers to frostbite during the Kargil War. He started a grocery shop in Belgaum after. 1/5 pic.twitter.com/4svEqcQLy8
— Nithin Kamath (@Nithin0dha) May 8, 2023
असे झाले लग्न नितीन कामथ हे 2007 मध्ये शिवाजी पाटील यांच्याकडे मुलीचा हात मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सरकारी नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. नितीन कामथ त्यावेळी करिअर करण्यासाठी धडपडत होते. कामथ यांच्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी लग्नाला होकार दिला. सीमा सोबत नितीन कामथ यांचे लग्न झाले.
कोण आहेत नितीन कामथ? भारतातील सर्वात मोठे ब्रोकरेज फर्म Zerodha चे नितीन कामत हे सह-संस्थापक आहेत. नितीन कामत यांनी 2010 मध्ये अत्यंत कमी भांडवलात ही फर्म सुरू केली होती. 2022 पर्यंत कंपनीचे मूल्य 15,612 कोटीपर्यंत वाढले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. करिअरमध्ये अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी लहान भाऊ निखिल कामत सोबत स्वतःची ब्रोकरेज फर्म झिरोधा सुरू केली.