Farmer Jugaad : जुगाड लावून शेतकऱ्याने बनवला स्वदेशी पाण्याचा पंप, कल्पना पाहून लोक म्हणाले…
Farmer Jugaad : सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात, सध्या शेतकऱ्याने केलेला एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.
मुंबई : एक शेतकरी समजू शकतो की, शेतात पाण्याची व्यवस्था असणं किती गरजेची आहे. शेतकरी प्रत्येकवेळी नवीन प्रयोग (Trending Video) करीत असतो. त्याचबरोबर काही शेतकरी तंत्रज्ञानाचं शिक्षण नसताना सुध्दा जुगाड (Farmer Jugaad) करुन अनेक गोष्टी करीत असतात. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर वेळ सुध्दा वाचतो. ज्यावेळी तुम्हाला शेतात पाणी न्यायचं असतं, त्यावेळी त्या मशीनला डिझेल आणि पेट्रोल पाहिजे असतं. ही गोष्ट अधिक खर्चेची असते. त्यामध्ये शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला. तो पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे.
मशीनमधून पूर्ण पाणी बाहेर पडू लागते
सोशल मीडियावर जुगाड केलेले अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्याचा व्हिडीओ पाहून त्या शेतकऱ्याला अशी कल्पना कशी काय सुचली असं अनेकांना वाटतं आहे. व्हिडीओमध्ये एक नळ दिसत आहे. तो पाण्याच्या पंपाच्या एका बाजूला जोडला आहे. त्यामधून पाणी बाहेर येत आहे. सेटअपमध्ये बॅटरीसह गरजेच्या गोष्टी त्या व्यक्तीने जोडल्या आहेत. एवढेच नाही तर तिथे एक बोर्डही दिसतं आहे, त्या बोर्डमध्ये छोटे बल्ब लावलेले आहेत. काही वेळाने व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती चाक फिरवताच मशीनमधून पूर्ण पाणी बाहेर पडू लागते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा कौतुक करालं एवढं मात्र नक्की.
Start 10HP pump without electricity.#jugaad pic.twitter.com/rd87kCIwGO
— Sugrive Meena IRS🇮🇳 (@MeenasSugrive) August 11, 2023
सर हे प्रॉडक्ट उपलब्ध आहे का ?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ IRS अधिकारी Sugrive Meena यांनी शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करीत असताना कॅप्शन लिहीलं आहे की,10 HP चा कृषी पंप विना विजेचा सुरु झाला आहे. 2 मिनट 20 सेकंदाचा हा व्हिडीओ अनेक तरुणांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांना हा व्हिडीओ आवडला सु्ध्दा आहे. दोन दिवसापूर्वी IRS अधिकारी Sugrive Meena यांनी हा व्हि़डीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत. एकाने त्या व्हिडीओला कमेंट केली आहे, सर हे प्रॉडक्ट उपलब्ध आहे का ? दुसरा एक व्यक्ती शंभर टक्के फुकटचा जुगाड आहे असं म्हणत आहे.