ज्युसर खाली ग्लास ठेवायला विसरला ‘खली’, 2 संत्रीचा ज्यूस काढल्यानंतरही ग्लास खालीच, पाहा भन्नाट Video!
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खली हायवेच्या बाजूला हातगाडीजवळ उभा आहे आणि ज्यूस मशीनमध्ये दोन संत्र्या टाकून ज्यूस काढू लागतो. पण, यादरम्यान तो ज्यूसचा ग्लास बरोबर मशीनच्या खाली ठेवायला विसरतो.
द ग्रेट खली जर कुस्तीनंतर कुठं सर्वात प्रसिद्ध असेल तर ते आहे इंस्टाग्राम, त्याने केलेले पराक्रम कोणीही करू शकत नाही. खली इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय असतो आणि सतत काही ना काही करत व्हिडिओ अपलोड करत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू फुटेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खली हायवेच्या बाजूला हातगाडीजवळ उभा आहे आणि ज्यूस मशीनमध्ये दोन संत्र्या टाकून ज्यूस काढू लागतो. पण, यादरम्यान तो ज्यूसचा ग्लास बरोबर मशीनच्या खाली ठेवायला विसरतो. त्यामुळे सर्व रस खाली पडू लागतो. ज्यूस काढत म्हणतो, मित्रांनो, तुम्ही म्हणता आमच्या भारताची प्रगती झाली नाही..! बघा, आम्ही भारतात पूर्वीही ज्यूस बनवायचो, अजूनही ज्यूस बनवतो आहोत. हे मेक इन इंडिया आहे…मग तो म्हणतो की, आपल्या देशाची प्रगती झाली की नाही, हे बघा, तरुण-तरुणी ज्यूस काढण्यात गुंतले आहेत, मित्रांनो देवा तुमचा भलं करो, काळजी घ्या..!
हा व्हिडीओ पाहा
View this post on Instagram
हा व्हिडिओ शनिवारी द ग्रेट खलीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल @thegreatkhali द्वारे शेअर केला गेला, जो हजारो युजरला आवडला आहे. खलीचा हा व्हिडिओ लोकांना मजेदार वाटत आहे. हे बघून लोक खूप एन्जॉय करू लागले आहेत. कुणी म्हणतं की तू कसा रस काढतोयस की सगळं बाहेर पडतंय. तर, आता खली ज्यूस सेंटर सुरू होणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
याआधी द ग्रेट खलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने बुक्की मारून दगड फोडला होता. याशिवाय, खलीच्या व्हिडिओंमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे, लोक त्याच्या व्हिडिओंवर मजेशीर कमेंट करत असतात. जसे लोकांनी या व्हिडिओवरील लोकांवर केले. एका यूजरने व्हिडिओवर लिहिले आहे की, सर, या ऑटोला उचला आणि चंद्रावर फेकून द्या..! कुठेतरी कुणी लिहिलंय की साहेब, हा ऑटो तुमच्यासाठी खेळणंच आहे.
हेही वाचा:
Video: दमदार दाढीची कमाल, 63 किलो महिलेला दाढीने उचलून झाला मालामाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव!
Video: माणिके मागे हिते वर बौद्ध भिक्षुंचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, संगीताला धर्म आणि भाषा नसते!