इजिप्तमध्ये विंचवांनी नांगी आपटली, आतापर्यंत 500 जणांना दंश, बाहेर न पडण्याचं सरकारचं आवाहन
सर्वाधिक भयानक परिस्थिती आहे अस्वान शहराची. जिथं विंचवांचं बाहेर पडण्याचं आणि लोकांना दंश करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. इथलं सरकारी वृत्तपत्र असलेल्या अल-अहरामने शनिवारी विंचू चावल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध केली.
इजिप्तचं नाव घेतलं तर समोर उभे राहतात पिरॅमिड आणि नजर जाईल तोवर वाळवंट. पण याच इजिप्तची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे विंचू. इजिप्शिन संस्कृतीवर बनवलेला कुठलाही हॉलीवूडचा चित्रपट पाहा, दर ममी असो की स्कॉर्पियन किंग. त्यात विंचवाने नांगी आपटली नाही असं होत नाही. कुठं ना कुठं आणि कधी ना कधी त्याचा संदर्भ येतोच, एवढंच काय तर पिरॅमिडच्या आत काढलेल्या भित्तीचित्रांवर आणि हजारो वर्ष जुन्या दस्तऐवजातही विंचू दिसला नाही असं होत नाही. आणि आता याच विंचूची दहशत इजिप्तमध्ये पुन्हा पसरल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत इजिप्तमध्ये 500 हून अधिक लोकांना विंचवाने दंश मारला आहे, ज्यातील 3 लोकांचा मृत्यूसुद्धा झाल्याची बातमी समोर आली होती. वादळ, वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वाळूखाली, दगडाखाली लपलेली विंचू बाहेर पडताहेत, आणि हाच मोठा त्रास आता इजिप्तमधील लोकांना सहन करावा लागत आहे. (The incidence of scorpion bites has quadrupled in Egypt. So far, 500 people have been bitten by scorpions)
विंचवाच्या दंशाने 500 जण रुग्णालयात
सर्वाधिक भयानक परिस्थिती आहे अस्वान शहराची. जिथं विंचवांचं बाहेर पडण्याचं आणि लोकांना दंश करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. इथलं सरकारी वृत्तपत्र असलेल्या अल-अहरामने शनिवारी विंचू चावल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध केली. ज्यात त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा हवाला दिला. मात्र काही वेळातच आसवानचे गव्हर्नर मेजर जनरल अशरफ अतिया म्हणाले की, तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी चुकीची आहे. मात्र, विंचू चावल्याने पाचशेहून अधिक लोक आजारी पडल्याचे त्यांनी मान्य केले.
इजिप्तमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी, अस्वान आणि आसपासच्या भागात जोरदार वादळ आलं. हे क्षेत्र तांबड्या समुद्राच्या पर्वतरांगांना लागून आहेत. म्हणजे काही भाग कोरडा तर काही हिरवा तर काही वाळवंट. पाऊस आणि पुरामुळे जमिनीखाली पाणी शिरलं आणि विंचू बाहेर आले. अस्वान शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झालं आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. मातीच्या विटांनी बांधलेली घरे कोसळली आहेत. टीव्ही, इंटरनेट आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.
#SevereWeather ? Major storm causes chaos in #Aswan, Egypt.
In the last few hours hail, heavy rain and gusts of wind ? have caused numerous incidents in the city. pic.twitter.com/s4s1luLYUa
— Meteored | YourWeather (@MeteoredUK) November 14, 2021
विंचवांचे 3000 अँटिव्हेनम दवाखाण्यात पाठवले
राज्यपाल अश्रफ अथिया यांनी सांगितले की, आताही 80 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. इतर लोकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. 3000 हून अधिक अँटीवेनम औषधे रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आली आहेत. विंचूंचे सर्वाधिक दंश ग्रामीण भागात झाले आहेत. दुसरी भीती सर्पदंशाची देखील आहे, जरी आतापर्यंत सर्पदंशाची कोणतीही घटना समोर आलेली नाही. तरी ही होण्याची दाट शक्यता आहे.
דרום מצרים, אסוואן, מכת עקרבים בעקבות גשמים עזים שהבריחו אותם לבתים. התוצאה – שלושה מתים ו-450 נפגעים מעקיצות עקרבים pic.twitter.com/XtqoP6uYxQ
— roi kais • روعي كايس • רועי קייס (@kaisos1987) November 13, 2021
विंचू चावण्याच्या घटना चौपट वाढल्या
अश्रफ म्हणाले की, पावसाळ्यानंतर विंचू चावण्याच्या घटना घडत असतात, मात्र यंदा ही प्रकरणं चौपटीने वाढली आहेत. बहुतेक प्रकरणं ग्रामीण भागातून येत आहेत, जी तांबड्या समुद्राच्या आसपासची आहेत. कारण जेव्हा डोंगरावर पाण्याचा प्रवाह वेगवान असतो, तेव्हा विंचूंच्या बिळांमध्ये पाणी भरतं आणि ते निवासी भागात येतात. आस्वानच्या रस्त्यांवर साचलेले पाणी काढण्यासाठी पंपिंग सेट बसवण्यात आलेत, ज्यामुळे विंचवांचा बंदोबस्त आपोआपचं होईल. विंचवांच्या या सामूहिक हल्ल्याची माहिती नसलेले लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागले, तेव्हा प्रशासनाची अवस्था दयनीय झाली.
बाहेर न पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना
जागतिक हवामान बदलामुळे इजिप्तसारख्या कोरड्या प्रदेशातही अतिवृष्टी होत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ सांगताहेत. त्यांच्या मते सरकारने याबाबत काहीतरी केले पाहिजे. दुसरीकडे, राज्यपाल अश्रफ अथिया यांनी अस्वानमध्ये लोकांच्या हालचालींवर बंदी घातली आहे. कारण खराब हवामानामुळे दृश्यमानताही कमी असते आणि त्यातच विंचूंचे हल्लेही झाले आहेत. लोकांना उघड्यावर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरांमध्येच राहा. सध्या जंगली, डोंगराळ आणि हिरव्यागार भागात जाणे टाळा. तसेच रस्ते आणि महामार्गांपासून दूर राहा. आवश्यक असल्यासच बाहेर पडा, आणि विंचवाच्या दंशापासून वाचण्यासाठी मजबूत शूज घाला असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, इजिप्तच्या हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढच्या काही दिवस अस्वान, मिनाया, असियट, सोहाग आणि लक्सर, दक्षिण सिनाई इथं जोरदार वादळ येऊ शकतं. किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार पडू शकते. म्हणूनच लोकांना सावध केले जात आहे की त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते करावे.
हेही पाहा: