Viral: बाबा रे! करोडपती घरातील महिला, भांडता भांडता नाल्यात पडल्या तरीही लाथा-बुक्क्या सुरूच!

हे तर काहीच नाही ठराविक वर्ग आहे, ज्या वर्गाच्या महिलाच भांडणात पडतात असा लोकांचा एक गैरसमज आहे. पण हा व्हिडीओ बघून तुमचा गैरसमज दूर होणार आहे. एका करोडपती घरातल्या महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आलाय. जबरदस्त भांडतायत, लाथा बुक्क्या!

Viral: बाबा रे! करोडपती घरातील महिला, भांडता भांडता नाल्यात पडल्या तरीही लाथा-बुक्क्या सुरूच!
भांडता भांडता नाल्यात पडल्या तरीही लाथा-बुक्क्या सुरूच!Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 12:22 PM

महिलांचं भांडण म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. महिला भांडायला लागल्या की झालंच, कुणी जर त्यांना थांबवू शकलं तर महान! आता आपण अशा महिला कुठे पाहिल्यात? असं जर विचारलं तर सगळे म्हणतील गल्लीत, चाळीत. म्हणजे ठराविक जागा आहेत जिथे महिलांचं भांडण पाहिलं जातं. हे तर काहीच नाही ठराविक वर्ग आहे, ज्या वर्गाच्या महिलाच (Women)भांडणात पडतात असा लोकांचा एक गैरसमज आहे. पण हा व्हिडीओ बघून तुमचा गैरसमज दूर होणार आहे. एका करोडपती घरातल्या (Crorepati Family) महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आलाय. जबरदस्त भांडतायत (Intense Fight), लाथा बुक्क्या! व्हिडीओ प्रचंड वायरल झालाय.

महिला अजमेरच्या कोट्यधीश कुटुंबातील

राजस्थानमध्ये महिलांच्या भांडणाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन्ही महिला नाल्याच्या आत आहेत आणि एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारतायत. या महिला अजमेरच्या कोट्यधीश कुटुंबातील आहेत, असा दावा केला जात आहे, त्या नात्याने एकेमकांच्या देवरानी-जेठानी आहेत. आता कारण काहीही असो, नाल्याच्या लढाईचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतोय.

हे सुद्धा वाचा

नाल्यात पडल्या पण थांबला नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्वाजा शहर अजमेर सिटीच्या ब्यावर शहरातील तटगड रोड येथील नायरा पेट्रोल पंपावर मालमत्तेच्या वादावरून दोन्ही बाजू आमने-सामने आल्या होत्या. या दरम्यान दोन्हीकडच्या महिलाही एकमेकींशी भिडल्या. यानंतर या देवराणी-जेठानी लढतींमधील हाणामारी इतकी वाढली की, लढता लढता लढता त्या दोघी जवळच्या नाल्यात पडल्या. वाढीव तर हे आहे कि त्या नाल्यात पडल्या पण तरीही थांबल्या नाहीत. नाल्यातून बाहेर येण्या ऐवजी त्या एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागल्या.

कुटुंबातील पुरुषांनीही उड्या मारल्या

@FactTheFactory ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अजमेरच्या कोट्यधीश घरातील देवरानी-जेठानी यांच्यातील वाद, भांडत असताना नाल्यात पडल्या.” या क्लिपला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. 45 सेकंदाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

दोन्ही बाजूचे लोक जखमी

या मारामारीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झालेत. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. पुढे या भांडणात एका कुटुंबातील पुरुष स्त्रीवर हात उगारतो, मग दुसऱ्या बाजूचा एक पुरुष लगेच पुढे येऊन लाथा मारू लागतो. शेवटी बराच वेळ झाल्यानंतर जवळ उपस्थित असलेल्या लोकांनीच हे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.