Art Collection: बड्या कलाकारांच्या 150 हून अधिक कलाकृती, जगातलं सगळ्यात महागडं आर्ट कलेक्शन, लिलाव होणार!
या संग्रहात 150 हून अधिक कलाकृती आहेत, ज्यात व्हिन्सेंट व्हॅन गॉग, क्लॉड मॉनेट, पॉल गॅगुइन आणि जॅस्पर जॉन्स यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
जगभरात कला आणि चित्रांच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. कलाकृती किंवा चित्रकलेचा लिलाव झाल्याचंही तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता जगातील सर्वात महागड्या कलासंग्रहाचा लिलाव होणार आहे. विशेष म्हणजे हा संग्रह मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल ॲलन यांचा असून त्याची किंमत जवळपास धक्कादायक आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार इतिहासातील काही बड्या कलाकारांच्या कलाकृती लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत.
या संग्रहात 150 हून अधिक कलाकृती आहेत, ज्यात व्हिन्सेंट व्हॅन गॉग, क्लॉड मॉनेट, पॉल गॅगुइन आणि जॅस्पर जॉन्स यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
“मला वाटते की ही एक विक्री आहे ज्यात सर्वोत्तम काम आहे,” असे क्रिस्टी च्या व्हाईस चेअरमन जोहाना फ्लोम यांनी सांगितले, ज्या लिलाव आयोजित करणार आहेत. या संग्रहाची रेंज खूप मोठी आहे.
2018 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी निधन झालेल्या ॲलन यांनी 1975 मध्ये बिल गेट्स यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टची सहस्थापना केली. रिपोर्ट्सनुसार, वयाच्या 65 व्या वर्षी 2018 मध्ये त्यांचे निधन झाले, तोपर्यंत त्यांनी गेल्या कित्येक वर्षात बनवलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृती खरेदी केल्या होत्या.
त्यामुळे हा संग्रह बऱ्यापैकी विस्तृत आहे आणि खरं तर पॉल ॲलनने त्यासाठी खूप मेहनत घेतलीये.
9 आणि 10 नोव्हेंबरला न्यूयॉर्कमध्ये हा लिलाव होणार आहे. ॲलनच्या संपत्तीमुळे या लिलावातून मिळणारी सर्व रक्कम त्याच्या इच्छेनुसार परोपकारासाठी समर्पित करणारेत. लिलावातील पैसा लोककल्याणासाठी वापरला जाईल. लिलाव मात्र फार मोठा असणारे.
असाच एक संग्रह मॅकलो कलेक्शन, सगळ्यात महागडा संग्रह होता. लिलाव सुरु झाल्यावर दोन आठवड्यांनी या संग्रहाने 922 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती. यावरून तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता या संग्रहाची किंमत काय असू शकते.