VIDEO | गाडीच्या पार्किंगसाठी मालकांनी शोधला नवा जुगाड, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकरी म्हणाले…

VIRAL VIDEO | गाडीची पार्किंग आपल्याला कायम राहावी, यासाठी मालकांनी नवा जुगाड शोधून काढला आहे. सद्या त्या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाचं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO | गाडीच्या पार्किंगसाठी मालकांनी शोधला नवा जुगाड, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकरी म्हणाले...
new parking jugaadImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 10:26 AM

मुंबई : सद्या अनेक लोकांकडे चारचाकी गाडी आहे, सद्या गाड्यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, गाडी पार्किंगची (Parking) समस्या मोठी झाली आहे. गाडी पार्किंगवरुन अनेकदा लोकांची भांडणं सुध्दा झाली आहेत. सोसायटीत राहणाऱ्या लोकांना रोज पार्किंगची समस्या होत असल्यामुळे लोकांनी एक नवा जुगाड (new parking jugaad) शोधून काढला आहे. तुमच्या पार्किंगच्या जागेत समजा गाडी उभी नसेल तर, त्या ठिकाणी इतर कोणी गाडी लावून निघून जातं, असं अनेकदा तुमच्यासोबत सुध्दा झालं असेल. ज्यावेळी तुम्हाला तिथं गाडी (car parking) लावायची असेल, त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. अशावेळी दोन लोकांच्यामध्ये अनेकदा भांडणं झालं आहे.

नवा जुगाड शोधून काढला

काही लोकांनी आपल्या गाडीची पार्किंग कायम राहावी यासाठी एक नवा जुगाड शोधून काढला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी म्हणतात की, पार्किंग स्पेस वाचवण्यासाठी ही चांगली आयडीया आहे. तर काहींनी जुनी नंबर प्लेट वापरण्याचा योग्य मार्ग आल्यानंतर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स’ (HSRP) नंबर प्लेट लिहिली. एक नेटकरी म्हणतात, त्यापेक्षा तिथं फ्लॅट नंबर लिहा. तुमचं जुगाडाबाबत काय मत आहे. हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Amar Drayan (@amar_drayan)

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती amar_drayan या नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्यक्तीने व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये पार्किंगची अनोखी संकल्पना असं लिहिलं आहे. नंबर प्लेट हवेत लावली आहे. सोसायटीतील पार्किंगच्या जागेवर फ्लॅटच्या मालकाचा स्वतःचा विशिष्ट क्रमांक असतो. पण हे कोण पाहत नाही. जिथं तुम्हाला जागा मिळेल, तिथं गाडी पार्क केली जाते. त्यामुळे लोकांनी गाडीची जुनी नंबर प्लेट तिथं लटकवली आहे. तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, नंबर प्लेट कशा पद्धतीने लावल्या आहेत. यामुळे लोकांना तिथं गाडी कोण पार्किंग करत याची माहिती समजेल. हा नवा जुगाड अनेकांना आवडला आहे. अशा पद्धतीचा नवा जुगाड आता अनेक ठिकाणी पाहायला मिळेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.