Photo | गोळ्यांच्या पत्ताप्रमाणे तयार केली खास लग्नपत्रिका, लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल…

गोळ्यांच्या पत्त्याप्रमाणे दिसणार्‍या लग्न पत्रिकेत त्या व्यक्तीने स्वतःचे आणि होणाऱ्या पत्नीचे नाव लिहिले आहे. यासोबतच त्यांने लग्नाची तारीख, जेवणाची वेळ आणि लग्नाचे ठिकाणे असे सर्वकाही त्या पत्रिकेत लिहिल्याचे दिसते आहे. त्या व्यक्तीने लग्नपत्रिका टॅबलेटच्या पत्त्यांच्या स्वरूपात बनवलीयं.

Photo | गोळ्यांच्या पत्ताप्रमाणे तयार केली खास लग्नपत्रिका, लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल...
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 1:12 PM

मुंबई : लग्न (Marriage) हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा (Important) दिवस असतो. प्रत्येकाला हा दिवस खास बनवायचा असतो. एका व्यक्तीने आपले लग्न खास बनवण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबलीयं. त्याने आपल्या लग्नाच्या पत्रिकेला असा काही वेगळा लूक (Look) दिलायं की, ती लग्नपत्रिका आता चर्चेचा विषय ठरलीयं. एका व्यक्तीने आपल्या लग्नाची पत्रिका गोळ्यांच्या पत्त्याप्रमाणे तयार केलीयं. सुरूवातीला हे बघितल्यावर कोणालाच विश्वास बसणार नाही की, ही लग्नपत्रिका आहे म्हणून, कारण त्या व्यक्तीने गोळ्याच्या पत्त्यावर मागील बाजूला ज्याप्रमाणे लिहिले जाते गोळीच्या कंपनीचे नाव, त्यामध्ये असलेले घटक वगैरे लिहिले जातात  त्याचप्रमाणे लग्नपत्रिका तयार केलीयं.

गोळ्यांच्या पत्त्याप्रमाणे दिसणार्‍या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गोळ्यांच्या पत्त्याप्रमाणे दिसणार्‍या लग्न पत्रिकेत त्या व्यक्तीने स्वतःचे आणि होणाऱ्या पत्नीचे नाव लिहिले आहे. यासोबतच त्यांने लग्नाची तारीख, जेवणाची वेळ आणि लग्नाचे ठिकाणे असे सर्वकाही पत्रिकेत लिहिल्याचे दिसते आहे. त्या व्यक्तीने लग्नपत्रिका टॅबलेटच्या पत्त्यांच्या स्वरूपात बनवलीयं. ही खास लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे लग्न 5 सप्टेंबर आहे. या पत्रिकेमधील विशेष बाब म्हणजे पत्रिकेमध्ये मित्र आणि नातेवाईक यांना लग्नाला येण्याचे आमंत्रण देखील देण्यात आलायं.

हे सुद्धा वाचा

मित्र आणि नातेवाईक सर्वांना दिले लग्नाचे निमंत्रण

ही सोशल मीडियावर व्हायरल होणारी लग्नपत्रिका अनेकांना आवडलीयं. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून पत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीचे काैतुकही केले जातंय. पत्रिकेमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही पत्रिका तामिळनाडू येथील असल्याचे कळते आहे. ही पत्रिका सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसते आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, आपले लग्न खास असावे आणि इतरांपेक्षा वेगळे. यामुळे असे काहीतरी वेगळे केले जाते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.