Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पोलीस कर्मचाऱ्याने कचरा वेचणाऱ्याला मुलाला घेतली नवीन कपडे आणि चप्पल, चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगतोय, व्हिडिओने अनेकांचं जिंकलं मनं

VIRAL VIDEO | एका पोलिस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये कचरा वेचणाऱ्या मुलाला पोलिस कर्मचाऱ्याने नवीन कपडे आणि चप्पल गिफ्ट केली आहे.

VIDEO | पोलीस कर्मचाऱ्याने कचरा वेचणाऱ्याला मुलाला घेतली नवीन कपडे आणि चप्पल, चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगतोय, व्हिडिओने  अनेकांचं जिंकलं मनं
punjab policeImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:44 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) झाले आहेत. चांगले व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत, त्यामधून लोकांपर्यंत चांगला मेसेज जावा एवढात त्यामागचा हेतू असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस (punjab police) कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असताना, रखरखत्या उन्हात कचरा वेचणाऱ्या एका मुलाची कशा पद्धतीने मदत करतो हे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओ अनेक लोकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचं नेटकऱ्यांनी कौतुक देखील केलं आहे. कपडे आणि चप्पल दिल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद बरंच काय सांगत आहे.

अभय गिरी यांच्याकडून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये पंजाब राज्यातील एक पोलिस कर्मचारी दिसत आहे. त्याचबरोबर कचरा वेचणारा एक मुलगा आहे. पोलिस कर्मचारी त्या मुलाला जवळ घेऊन पाणी पाजत आहे. तो मुलगा कचरा वेचत असल्याचं एका वेबसाईनं म्हटलं आहे. काही सेकंदाच्या व्हि़डीओने लोकांचं मन जिंकलं आहे. पोलिस कर्मचारी सुरुवातीला त्या मुलाला नवीन चप्पल देत आहे. त्यानंतर त्या मुलाला नवीन पॅन्ट आणि शर्ट दिलं आहे. त्या मुलाने त्या पोलिस कर्मचाऱ्याचे आभार देखील मानले आहे. ज्यावेळी इतक्या वस्तू एकाचवेळी त्या मुलाला भेटल्या, त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ आतापर्यंत 84 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याचं अभिनंदन केलं आहे. ‘पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या भेटवस्तूबद्दल हा मुलगा पोलीस कर्मचाऱ्याचे मनापासून आभारी असल्याचे नेटकऱ्यांनी कमेंट केले. काहींनी प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की, ‘रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना कपडे आणि बूट यासारख्या मूलभूत गोष्टी देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

View this post on Instagram

A post shared by Abhay Giri (@abhaygiri21)

अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांच्या पसंतीला देखील पडले आहेत.

खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.