सापाने वारंवार केला दंश , पण….त्या वस्तूने वाचवले प्राण, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल !
सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ वेगाने व्हायलर होत आहे. या व्हिडीला पाहून तुम्हाला धक्का बसेल.या व्हिडीओत एक साप एका इसमाला वारंवार दंश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतू सर सलामत तो पगडी पचास या न्यायाने या इसमाला त्याच्या टोपीने वाचविल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओत तर हास्याची कारंजी फुलवतात, तर काही व्हिडीओ विचार करायला प्रवृत्त करीत असतात, काही व्हिडीओ निसर्गातील प्राण्यांचा स्वभाव दर्शविणारे असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वारंवार पाहीला जात आहे. या व्हिडीओत एका खतरनाक जनावराचा आहे. ज्याचे नुसते नाव घेतले तरी अनेकांना कापरं भरते. हा व्हिडीओ एका जीवघेण्या चाव्याचा आहे. ज्याच्या चाव्यामुळे माणूस पाणी देखील मागत नाही असा हा भयंकर सरपटणारा प्राणी आहे.
सोशल मीडियावर सांपाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले असतात. कधी साप आणि मुंगसाच्या लढाईचे व्हिडीओ व्हायरल होतात. तर कधी स्कुटरमधून साप निघालेला दिसतो. तर कधी लोकलमधून तर कधी टॉयलेटमध्ये सापाचा डेरा जमलेला पाहून अनेकांच्या तोंडाचे पाणी पळते. सध्या एक असाच वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की असे देखील होऊ शकते. या व्हिडीओला पाहून देव तारी त्याला कोण मारी ही म्हण देखील अनेकांना आठवू शकते.




सापाने वारंवार केला दंश , पण….
व्हिडीओत एक माणूस कॅप घालून बसलेला दिसत आहे. या व्हिडीओत आपण पाहायला मिळते की एक व्यक्ती आरामात बसलेली दिसत आहे. तिला तिच्या मागे एक जीवघातक जनावर लपले आहे. आणि दंश करीत आहे कळतच नाही असा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. हा विषारी साप एव्हरी अनेकांना मृत्यूचा मार्ग दाखवत असतो. परंतू दैव बलवत्तर म्हणून या इसमाच्या डोक्यावर असलेल्या कॅपमुळे या इसमाचे लाख मोलाचे प्राण वाचल्याचे दिसत आहे. या माणूस आरामात मोबाईलवर गप्पा हाणत आहे. त्यालाही माहीती नाही की पुढच्या क्षणाला मृत्यू त्याच्या डोक्यावर तांडव करीत आहे. सापाचा तोंड उघडताना दिसत आहे. आणि हा साप वेगाने या इसमाच्या डोक्यावर दंश करीत आहे.
He was saved by the cap 😮 pic.twitter.com/5vNG5bEofI
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) February 21, 2025
येथे पहा व्हायरल व्हिडीओ –
इसमाला नंतर या सापाचा दंश होत असल्याने त्याला थोडी जाणीव होते. तो पलटून मागे बघतोही परंतू सापाच्या जबड्याची पकड इतकी मजबूत आहे की त्या इसमाची कॅप त्याच्या तोंडात येते. हा व्हिडीओ एक्स हँडल @AMAZlNGNATURE वर शेअर झाला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देखील मस्त लिहीली आहे की तो आपल्या टोपीमुळे वाचला. या व्हिडीओला आतापर्यंत सात लाखाहून अधिक व्युज मिळाले आहेत.
Disclaimer: ही बातमी सोशल मीडियावरील पोस्ट केलेल्या व्हिडिओवरुन तयार केली आहे. टीव्ही 9 मराठी वेबसाईट या बातमीला दुजारो देत नाही.