Bramhastra Review Viral: “ब्रम्हास्त्र”ची कथाच न्यारी, सिनेमा पेक्षा रिव्ह्यूच भारी! हा “तोड” रिव्ह्यू पाहिलाय का? लोकं हसून लोटपोट
आता तर मंडळी या सिनेमा पेक्षा रिव्ह्यू भारी पडतायत. या सिनेमावर रिव्ह्यूचा पाऊस पडतोय. साधासुधा रिव्ह्यू नाही. इतके विनोदी रिव्ह्यू पडतायत की विषयच!
ब्रम्हास्त्र सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्यावर बहिष्काराचा ट्रेंड सुरु झाला होता. हा सिनेमा तरीही अगदी पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमा रिलीज झाला आणि लोकांनी रिव्ह्यूचा धडाकाच लावला. आता तर मंडळी या सिनेमा पेक्षा रिव्ह्यू भारी पडतायत. या सिनेमावर रिव्ह्यूचा पाऊस पडतोय. साधासुधा रिव्ह्यू नाही. इतके विनोदी रिव्ह्यू पडतायत की विषयच! असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ह्या इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं आलिया भट ची एकदम तोड मिमिक्री केलीये. अशी मिमिक्री तुम्ही कुठंच पाहिली नसेल. डोळे बंद करून जर ऐकलंत तर आलिया च बोलते की काय असं वाटतंय.
ही आहे मिमिक्री आर्टिस्ट चांदनी! अनेकदा आलियाच्या आवाजात आणि हावभावात मजेशीर व्हिडिओज बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करत असते, जे युजर्संनाही खूप आवडतं.
हा व्हिडीओ बघा, यात चांदनी आलिया भटचा आवाज, चेहऱ्यावरील हावभाव, अगदी हाताच्या हालचालींची नक्कल सुद्धा हुबेहूब करताना दिसतीये.
व्हिडीओ
View this post on Instagram
यावेळी चांदनीने आलियाच्या ईशा व्यक्तिरेखेची नक्कल केलीये, जी अभिनेत्रीने ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात साकारलीये. या व्हिडिओत ती “शिवा…शिवा!” असा सतत आवाज देताना दिसतीये.
या व्हिडिओला जवळपास 20 लाख व्ह्यूज आणि 1 लाख 15 हजार लाईक्स मिळाले आहेत.लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी लिहिले,” या व्हिडिओची चित्रपटापेक्षा जास्त वाट पाहत होता, तर एकाने लिहिले – मजा आ गया यार!”
आयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमा आहे. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख खानने ‘वानर अस्त्र’ म्हणून एक कॅमिओ केला आहे, ज्याचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलंय.
सिनेमा पेक्षा सिनेमाचे रिव्ह्यूज चांगलेच गाजताना दिसतायत. रिव्ह्यूजने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय.