Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नकली समजून कचऱ्यात फेकायला निघालेल्या हिऱ्याने आजीबाईला केलं कोट्यधीश, हिऱ्याची किंमत तब्बल…

ज्या गोष्टीला नकली समजून एक वृद्ध महिला कचऱ्यात फेकून देणार होती, तो असली हिरा निघाला आणि ही महिला रात्रीत कोट्यधीश झाली.

नकली समजून कचऱ्यात फेकायला निघालेल्या हिऱ्याने आजीबाईला केलं कोट्यधीश, हिऱ्याची किंमत तब्बल...
लिलावात विक्रीसाठी आलेला 20 कोटींचा हिरा
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 8:30 AM

कधी कुणाचं नशीब पलटेल आणि अगदी कचरा वाटणारी गोष्ट सोनं होईल हे सांगता येत नाही. असाच काहीसा किस्सा युनायटेड किंग्डम म्हणजेच यूकेमधून समोर आला आहे. ज्या गोष्टीला नकली समजून एक वृद्ध महिला कचऱ्यात फेकून देणार होती, तो असली हिरा निघाला आणि ही महिला रात्रीत कोट्यधीश झाली. (The thing that is thrown in the trash as a stone turned out to be a real diamond. An elderly woman in the UK got Rs 20 crore)

यूकेतील या वृद्ध महिलेला तिच्या संग्रहातून 34 कॅरेटचा हिरा सापडला, ज्याची किंमत £2 दशलक्ष म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपये होती. या 70 वर्षीय महिलेने वर्षांपूर्वी कार बूट विक्रीतून हा स्टोन खरेदी केला होता. मात्र, त्याच्या किंमतीची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. महिलेला इतर दागिन्यांमध्ये हिरा सापडला होता आणि ती तो कचरा पेटीत टाकणारच होती. तेवढ्यात तिथं एक शेजारी आला आणि त्याने या महिलेला हा हिरा फेकण्याआधी त्याचं मुल्यांकन करण्याचा सल्ला दिला. जो या महिलेने मानला.

कचऱ्यात जाणाऱ्या हिऱ्याने नशीब पालटलं

या वृद्ध महिलेला अचानक कळलं की, ती फेकणार होता तो कोट्यवधी रुपयांचा हिरा आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थम्बरलँडमध्ये 70 वर्षीय महिलेला घर साफ करत असताना हा हिरा सापडला. सुरुवातीला, तिला वाटले की हा कुठल्यातरी ड्रेसमध्ये लावलेला नकली दगड आहे, जो गळून पडला असेल. म्हणून तिने त्याला फार महत्त्व दिलं नाही. मात्र जेव्हा तिने शेजाऱ्याच्या सांगण्यावरुन हा हिऱ्याची किंमत किती असू शकते हे पाहण्यासाठी सराफाकडे नेला, तेव्हा तो हिरा तब्बल 34-कॅरेटचा निघाला, ज्याची किंमत £20 दशलक्ष पाऊंड म्हणजेच 20 कोटी रुपये असल्याचं तिला कळालं.

पाहा हिऱ्याचा लिलावातील फोटो

छोट्याशा हिऱ्याने 20 कोटी दिले

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, महिलेने काही वर्षांपूर्वी कार बूट विक्रीतून हा दगड इतर अनेक वस्तूंसह खरेदी केला होता. शेवटी जेव्हा तिला हिऱ्याची खरी किंमत कळली तेव्हा तिला धक्काच बसला. जी गोष्ट आपण कचऱ्यात टाकणार होतो, ती इतक्या किंमतीची असेल यावर तिचा विश्वासच बसेना.

हिऱ्याचा फोटो शेअर करताना, Featonby च्या लिलावकर्त्यांनी Instagram वर एका पोस्टमध्ये लिहिले की, ” या स्थानिक महिलेने आपली ओळख लपवली आहे, तिला या प्रक्रियेत अज्ञात राहायचं होतं. तिच्याकडे हा हिरा अनेक वर्षांपासून पडू होता, हा हिरा क्युबिक झिरकोनिया असू शकतो असा आमचा विश्वास आहे”

हेही पाहा:

Video: दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख, वाढदिवसाचं खास गिफ्ट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Video: आईस्क्रिम खाताना चिमुरड्याची गोंडस रिएक्शन, व्हिडीओ पाहून तुम्हालाही भारी वाटेल!

 

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.