Video : मार्केटमध्ये नव्या बाबाचा धुमाकूळ, गॅरंटीने नशामुक्ती करतात, पण इलाजावर भरवसा हवा….

एक बाबा दारू सोडवण्यासाठी आलेल्या मद्यपि भक्ताला चांगलाच 'प्रसाद' देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे...

Video : मार्केटमध्ये नव्या बाबाचा धुमाकूळ, गॅरंटीने नशामुक्ती करतात, पण इलाजावर भरवसा हवा....
viral video of baba Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 12:44 PM

दारुच्या नशेमुळे संसाराची राखरांगोळी होते. त्यामुळे ‘संसाराचा नाश करते दारू बाटलीला स्पर्श नका करु’ अशा सारखी घोषवाक्यं दारुमुक्ती अभियानांतर्गत दिली जातात. परंतू दारुची नशा सोडविण्याचा बाजार देखील मोठा आहे. दारु पिऊन गटारात लोळणाऱ्या तळीरामांसाठी अशा नशामुक्ती केंद्राची भरमार झाली आहे. काही जण शास्रीय पद्धतीने मानसोपचार करुन देखील दारु सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतू अशा काही राज्यात तरी दारुबंदी कायदा लागू आहे. तरीही शेजारच्या राज्यातून दारुचा पुर या राज्यात येत असतो. काही गावात दारुबंदी असते. तर तळीराम शेजारच्या गावातून दारुला मुक्तद्वार देतात. ‘न सांगता 24 तासांत दारु सोडवा’ अशा जाहिराती देखील तुम्ही सार्वजनिक शौचालयांच्या भिंतींवर पाहील्या असतील. परंतू आता दारुमुक्तीचे प्रॅक्टीकल दाखविणारा एक नवा बाबा बाजारात आला आहे. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तूफान व्हायरल झाला आहे.

जळगावमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका बाबाच्या दरबारात भक्त बसल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या बाबाकडे दारू सोडवण्यासाठी गेलेल्या एका मद्यपीला बाबाने आपल्या अनोख्या शैलीत दारु सोडविण्यासाठी प्रसाद दिल्याचे दिसत आहे. हा प्रसाद म्हणजे बाबांनी आपल्या मुखातून काढलेली शब्द सुमने आणि हाताने दिलेला आशीर्वाद समजून दारुच्या आहारी गेलेला तरुण भक्तीत लीन झालेला दिसत आहे. बाबाने आपल्या या पामर भक्तांला चांगलाच चोप दिला आहे.

व्हिडीओ येथे पाहा –

बाबांचा प्रसाद

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मद्यपी दारू सोडवण्यासाठी बाबाच्या दरबारात बसला आहे. बाबा त्या तरुणाच्या बापाचा चांगलाच उद्धार करताना दिसत आहे. आणि बाबा त्या मद्यपीला बेदम मारहाण करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतू भक्त स्वत:च्या दारुच्या सवयीने इतका बेजार आणि पश्चाताप झालेला दिसत आहे की इतका मार खाऊनही त्या बाबाला पुन्हा मला शिक्षा करा असे म्हणून आपली पाठही झोडपायला देत आहे. अखेर व्हिडीओतील या मद्यपीच्या नातलगालाच दया येताना दिसत आहे. तो त्या मद्यपीला बाबापासून दूर नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट होऊ शकलेले. नाही मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे….

Non Stop LIVE Update
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ.
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार.
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?.
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न.
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?.
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा...
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा....