Video | माणसाच्या हातात स्मार्टफोन पाहून माकडाच्या पिल्लाने असे काही केली की, युजर म्हणाले आजच्या पिढीची हीच अवस्था
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती माकडाच्या लहान पिल्लाचे फोटो आणि व्हिडीओ काढतो आहे. मात्र, हे छोटे पिल्लू त्या व्यक्तीच्या हातामधून मोबाईल घेण्यासाठी अनेक प्रयत्न करते.
मुंबई : प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ (Video) नेहमीच सोशल मीडियावर शेअर केले जातात. हे व्हिडिओ अत्यंत आश्चर्यकारक असतात. माकडांचे मजेदार व्हिडिओ सर्वाधिक पसंत केले जातात. जर आपण जंगलातील सर्वात खोडकर प्राण्यांबद्दल बोललो तर माकडाचे (Monkey) नाव सर्वात वर येते. कधी कधी माकडे माणसांसारखे वागू लागतात. काही दिवसांपूर्वी माकडाचा एक व्हिडीओ सोशल मीडिवर प्रचंड व्हायरल झाला होता, त्या व्हिडीओमध्ये माकड आपल्या लेकराला अंघोळ घालताना दिसत होते. तो व्हिडीओ अनेकांना आवडला होता. तसाच आता अजून एक छोट्या माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
इथे पाहा माकडाच्या पिल्लाचा व्हायरल होणार व्हिडीओ
Young generation is mad with smart phones ☺️ pic.twitter.com/hFg8SH9VyZ
हे सुद्धा वाचा— Susanta Nanda IFS (@susantananda3) August 10, 2022
लहान मुलांप्रमाणेच माकडाच्या पिल्लाला स्मार्टफोनची क्रेझ
सध्या स्मार्टफोनची क्रेझ प्रचंड आहे. घरातील लहान मुले जेवण करण्यासाठी त्रास देत असतील तर त्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिली की, ते लगेचच जेवण करतात. लहान मुलांना स्मार्टफोन खूप आवडतो, त्यांच्या हातामध्ये एकदा स्मार्टफोन दिला की, ते जागेवरूनही उठत नाहीत. मात्र, फक्त लहान मुलेच नाही तर माकडांच्या पिल्यांना देखील स्मार्टफोन आवडतो हे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून पुढे आले आहे.
मानसाच्या हातातून मोबाईल घेण्यासाठी पिल्लाची धडपड
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती माकडाच्या लहान पिल्लाचे फोटो आणि व्हिडीओ काढतो आहे. मात्र, हे छोटे पिल्लू त्या व्यक्तीच्या हातामधून मोबाईल घेण्यासाठी अनेक प्रयत्न करते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीच्या हातातील स्मार्ट फोन पाहून माकडाचे पिल्लू मानसाच्या मुलांसारखे फोन घेण्यासाठी धडपड करते आहे.
सुशांत नंदाने ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ
हा व्हिडिओ सुशांत नंदाने ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘खरंच आजच्या पिढीची ही अवस्था आहे.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. इतकंच नाही तर अनेक लोक हा व्हिडिओ परत परत पाहत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार कमेंट देखील केल्या असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.