Video | मांजरीचा मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
मांजर नेहमीच घरात खोडसाळपणा करते. असाच काहीसा प्रकार व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बघायला मिळतो आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजरीसमोर एक मोठा सरडा आहे जो खतरनाक दिसत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) जास्त प्रमाणात प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होतात. विशेष: कुत्रे आणि मांजऱ्यांचे व्हिडीओ सर्वांनाच बघायला आवडतात. फेसबुक ते इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहज मांजरीचे व्हिडीओ (Video) सापडतात. खासकरून जर आपण मांजरींबद्दल बोललो तर मांजरीचे अनेक गोंडस आणि मस्ती करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) हा सेव्ह करून ठेवाल.
इथे पाहा मांजरीचा व्हायरल होणारा व्हिडीओ
does he like being used as a scratch pad ? pic.twitter.com/GC1cO5Vhf8
हे सुद्धा वाचा— glurpo (@glurpo) August 7, 2022
मांजरीचा खोडसाळपणा करतानाचा व्हिडीओ व्हायरल
मांजर नेहमीच घरात खोडसाळपणा करते. असाच काहीसा प्रकार व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बघायला मिळतो आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजरीसमोर एक मोठा सरडा आहे जो खतरनाक दिसत आहे. एकीकडे सरडा आरामात बसलेला आहे आणि दुसरीकडे त्याच्या शेजारी बसलेली एक मांजर सरड्याच्या अंगावर खाजवत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की मांजरीला हे करताना खूप मजा येत आहे, परंतु विशेष बाब म्हणजे सरडा देखील अत्यंत शांत बसलेला आहे.
मांजरीचा व्हिडीओ 96 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला
हा व्हिडिओ @glurpo नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मांजरीने त्याला स्क्रॅच पॅड बनवले.’ हा व्हिडिओ 96 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांना मांजरीचे हे वागणे प्रचंड आवडलेले दिसते आहे. एका युजरने लिहिले की, ‘तुमच्या आरामासाठी अशा प्रकारे एखाद्याला त्रास देणे चुकीचे आहे. मात्र, हा व्हिडीओ लोकांना चांगला आवडत असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे.