900 वर्ष जुना नकाशा, या नकाशात दडलीत जगातील अनेक गुप्त रहस्य…
हे जग अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. त्यातील फार थोडीच रहस्य मानवाला कळू शकली आहे. तर असंख्य रहस्ये अजून कळायची बाकी आहेत. अनेक गोष्टी सांकेतिक असल्याने रहस्य उलगडणं कठिण होऊन बसलं आहे. जगात दोनच प्राचीन नकाशे आहेत. त्यातील एक भारताकडे आहे. पण त्यातील सांकेतिक गोष्टींमुळे या नकाशातील अर्थांचा आणि रहस्यांची उकल होत नाहीये.
प्राचीन काळात जागाची भौगोलिक माहिती जाणून घेण्यासाठी नकाशे तयार केले आजयचे. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये असा एक अनोखा नकाशा आहे की, त्याला जगातील सर्वा अद्भूत नकाशा मानलं जातं. इतिहासकारांच्या दाव्यानुसार, अशा प्रकारचे नकाशे जगात फक्त दोनच आहे. एक भारतात आणि दुसरा ब्रिटनच्या संग्रहालयात. नैसर्गिक रंगाचा वापर करून हे नकाशे तयार करण्यात आले आहेत, हे त्याचं मुख्य वैशिष्ट्ये आहे. यात अडीच बेटांमध्ये संपूर्ण जग दाखवलेलं आहे. या नकाशात नदी, डोंगर आणि इतर नैसर्गिक स्थळांना नैसर्गिक रंगानी दर्शवलेलं आहे.
जैन धर्मियांकडे अडीच बेटाच्या नावाचा संपूर्ण जगाचा नकाशा आहे, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. जवळपास 12 व्या आणि 13 व्या शतकाच्या दरम्यान हा नकाशा तयार करण्यात आला होता. हा नकाशा एका कपड्यावर तयार करण्यात आला होता. या नकाशाच्या निर्मितीसाठी नैसर्गिक रंग वापरण्यात आला होता. त्याकाळात झाड, रोपटे, फळ आणि भाजीपाल्यांपासून हा रंग तयार करण्यात आला होता. भारताच्या चित्रकला शैलीचा हा अद्भूत नमूनाच आहे.
अभ्यासकांना उत्सुकता
या नकाशात भौगोलिक आणि खगोलीय घटनांचं अद्वितीय चित्रण करण्यात आलं आहे. यात नद्या, पर्वत, समुद्र आणि इतर भौगोलिक गोष्टींचं बारकाईने चित्रण करण्यात आलं आहे. भारताच्या बाहेर भारतीय दर्शनशास्त्रावर अभ्यास करणारे इतिहासकारही या नकाशातील माहिती घेण्यासाठी संपर्कात आहेत. ते या नकाशातील गुप्त रहस्य जाणून घेऊन जगाच्या समोर मांडण्यास उत्सुक आहेत. तसा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
आणखीही काही नकाशे
या नकाशाच्या माध्यमातून भारताचं प्राचीन ज्ञान आणि सांस्कृतिक विश्वाला जगासमोर आणण्याची एक अनोखी संधी मिळाली आहे. हा नकाशा दूर्मीळ वस्तूंच्या श्रेणीत ठेवण्यात येऊ शकतो. इतर काही नकाशेही आहेत. पण ते अर्वाचीन आणि या कालखंडाच्या काही वर्षानंतरचे आहेत. ते एवढे जुने नाहीत. मात्र, या कालखंडाचा आणखी एक नकाशा ब्रिटिश म्यूझियममध्ये आहे. लंडन विद्यापीठाचे प्रोफेसर या नकाशाचा अभ्यास करत आहेत.