भारतात मुलींनी दुचाकी (Girls Riding Bike) चालवणं अजूनही तितकंच दुर्मिळ आहे. इथे अजूनही जेव्हा केव्हा मुली, बायका गाड्या चालवताना दिसतात तेव्हा त्यांच्याकडे अशाच नजरेने पाहिलं जातं जणू काय त्या कुठून वेगळ्याच देशातून आल्यात. आजही, अजूनही परिस्थिती तशीच आहे. खरं तर एखाद्या बाईनं दुचाकी चालवणं तितकंच सामान्य असायला हवं जितका एखादा माणूस दुचाकी चालवतो. तरीही असं काही दिसलं की लोक त्याचा व्हिडीओ काढतात आणि व्हिडीओ व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय ज्यात एक बाई आपल्या नवऱ्याला दुचाकीवरून घेऊन जात आहे. व्हिडीओ कमाल आहे. व्हिडीओ बघून या महिलेला दुचाकी चालवणं रोजचंच असल्यासारखं दिसून येतं. एका स्कूटर वर ही महिला (Woman Riding A Bike) आपल्या पतीला घेऊन चाललीये. खेड्यात ही दृश्य फार कमी पाहायला मिळतात त्यामुळे या व्हिडिओचं फार कौतुक केलं जातंय.
महिलेच्या मागे बसलेला तो पुरुष एका बाजूला दोन्ही पाय सोडून बसलेला आहे. महिला साडी नेसून कशा बसतात दुचाकीवर, अगदी तसाच! हेच बघून खरं तर जास्त मजा वाटते.
हा व्हिडीओ 3 सप्टेंबर रोजी सुष्मिता डोरा नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला साडी नेसून बाईक चालवताना दिसत आहे, तर एक वृद्ध व्यक्ती पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून मोटारसायकलच्या मागच्या सीटवर बसलेली आहे.
मागे असलेल्या एका व्यक्तीने त्याचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओचं खूप कौतुक करतायत
हा व्हिडिओ पोस्ट करताना यावर लिहीलं गेलंय, “सहसा जेव्हा आपण बाइकर कपल पाहतो तेव्हा नेहमी एक पुरुष बाईक चालवत असतो आणि ती महिला मागे बसलेली असते, पण इथे काहीतरी उलटं दिसलंय.”