Video : मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला, पाय घसरुन पडला, चक्क डोंगराच्या मधोमध अडकला, 127 Hours सिनेमापेक्षाही भयंकर!

केरळमध्ये (Kerala) एक धक्कादायक घटना घडली आहे. काही मित्र ट्रेकिंग करण्यासाठी केरळमधील पलक्कड येथील मलमपुझा भागात गेले होते. यावेळी ट्रेकिंग (Trekking) करत असताना एका तरूणाचा तोल गेला आहे आणि तो पहाडाच्या मध्यभागी अडकला आहे. विशेष म्हणजे हा तरूण (Young) सोमवारपासून अडकून बसला आहे.

Video : मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला, पाय घसरुन पडला, चक्क डोंगराच्या मधोमध अडकला, 127 Hours सिनेमापेक्षाही भयंकर!
तरूण पहाडावर अडकला
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:16 PM

त्रिवेंद्रम : केरळमध्ये (Kerala) एक धक्कादायक घटना घडली आहे. काही मित्र ट्रेकिंग करण्यासाठी केरळमधील पलक्कड येथील मलमपुझा भागात गेले होते. यावेळी ट्रेकिंग (Trekking) करत असताना एका तरूणाचा तोल गेला आहे आणि तो डोंगराच्या मध्यभागी अडकला आहे. विशेष म्हणजे हा तरूण (Young) सोमवारपासून अडकून बसला आहे. पडल्यामुळे तरूण जखमी देखील आहे. तरूणाला खाण्या-पिण्याचे साहित्य पाठवणे देखील अवघड झाले आहे.

केरळमधील तरूण पहाडावर अडकला

त्याचे झाले असे की, काही मित्र मिळून ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. मात्र, तोल जाणून हा तरूण डोंगराच्या मध्यभागी अडकला. त्यानंतरसोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, हा तरूण ज्याठिकाणी अडकला आहे तेथे पोहचणे अवघड आहे. त्यानंतर तरूणाच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहीती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस देखील या तरूणाची काहीही मदत करू शकले नाही. या तरूणाचा डोंगरावर अडकलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

इथे पाहा तरूणाचा पहाडावर अडकलेला व्हिडीओ 

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मागितली मदत

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तर तरूणाला वाचवण्यासाठी भारतीय सेना आणि एनडीआरएफची मदत देखील मागितली आहे. हा तरूण जवळपास 127 तासांपासून डोंगरावर अडकलेला आहे. केरळमधील ही सर्व घटना एखाद्या चित्रपटातील स्टोरीसारखीच वाटते आहे. तरूणाला वाचवण्यासाठी पलक्कडमध्ये कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरसह अनेक प्रयत्न केले गेले आहेत. या तरूणाकडे अन्न-पाणी नाहीये. मात्र, तरूणाला काहीही मदत पुरवता येत नाहीये.

संबंधित बातम्या : 

VIDEO : लग्नातील वऱ्हाडींचा श्रीवल्ली ठेका, डान्स पाहून जेवणकऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका!

Emotional Video Viral : जगात आईपेक्षा कुणीही मोठं नाही म्हणत मुलाचा प्राणत्याग!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.