या मुलीला प्रत्येक खाद्यपदार्थाची आहे ॲलर्जी; गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त दोनच गोष्टीवर आहे जिवंत
एक अशी मुलगी आहे जिला प्रत्येक खाद्यपदार्थाची एलर्जी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती एका वेगळ्याच आजाराशी लढत आहे. ती फक्त दोनच गोष्टी खाऊ शकते ज्यांच्यापासून तिला अॅलर्जी होत नाही. कित्येक वर्षांपासून ती या दोनच गोष्टींवर तिची भूक भागवत आहे.
आपल्याला जे पदार्थ आवडतात ते खाता आले नाही किंवा सतत कोणीतरी आपल्याला ते पदार्थ खाण्यापासून रोखत असेल तर नक्कीच चिडचिड होते. कारण प्रत्येकजन खाण्याच्या शौकीन असतात. पण विचार करा तुम्हाला जर वर्षानुवर्षे फक्त एकच किंवा दोनच पदार्थ खाण्यासाठी दिले तर? नक्कीच असं कोणालाच जमणार नाही. पण असच आयुष्य जगत आहे एक मुलगी जिला सर्वच खाद्यपदार्थापासून अॅलर्जी आहे.
प्रत्येक पदार्थापासून आहे अॅलर्जी
अमेरिकेतील एक अशी मुलगी आहे जिला सर्वच पदार्थांची ॲलर्जी आहे. अशा परिस्थितीत, ती आपली भूक भागवण्यासाठी फक्त दोन प्रकारच्या पदार्थांवर अवलंबून आहे. 2017 मध्ये तिला हा दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालं. यानंतर ती फक्त दोनच प्रकारचे अन्न खाते.
कॅरोलिन क्रे असं या 24 वर्षीय महिलेचे नाव आहे. सप्टेंबर 2017 मध्ये तिने जेव्हा आईस्क्रीम खाल्ले तेव्हा तिला ॲनाफिलेक्टिक शॉक लागला. त्यानंतर तिने ब्रेड आणि पिझ्झा खाल्ला तेव्हाही तिला अॅलर्जी झाली. त्यानंतर भात आणि बीन्स खाल्ल्यानंतरही तिला त्रास झाल्याने ती 12 दिवस आयसीयूमध्ये होती. क्रेने हे सर्व एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
फक्त दोनच पदार्थांवर जगते ही मुलगी
कॅरोलिन क्रेने सांगितले की तिला सर्व गोष्टींची ऍलर्जी आहे आणि ती फक्त दोन प्रकारच्या खाद्यपदार्थांवर अवलंबून आहे. यापैकी एक म्हणजे ओट्स किंवा त्यापासून बनवलेले अन्न आहे आणि दुसरे हायपोअलर्जेनिक अन्न आहे, जे लहान मुलांना दिले जाते. पण हे जेवणही ती अगदी आनंदाने खाते असं क्रेनं सांगितलं आहे.
सुरुवातीला ही ॲलर्जी काही महिन्यांत बरी होईल, अशी आशा डॉक्टरांना होती. क्रे म्हणाली की 2017 मध्ये, जेव्हा मला काहीही खाल्ल्याने वारंवार झटके येत होते, तेव्हा माझ्या ऍलर्जिस्ट आणि डॉक्टरांचा असा विश्वास होता की माझी प्रतिक्रिया फक्त काही महिने राहिल आणि नंतर मी बरी होण्यास सुरुवात होईल. डॉक्टरांनी त्याला अँटीहिस्टामाइन औषधे दिली आणि त्याला तज्ञांकडे पाठवले. मात्र त्यानंतरही काही फरक पडत नसल्याचे क्रेने सांगितले.
ट्रीटमेंट घेऊनही फरक पडला नाही
एक वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊनही एलर्जी थांबली नसल्याचे क्रेने म्हटले. तिने ते दोन पदार्थ सोडून दुसरे पदार्थ खाल्ले तरी तिच्या घशाला त्रास होऊ लागायचा. खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास व्हायचा. जवळजवळ एक वर्षाच्या चाचणीनंतर, मे 2018 मध्ये, क्रेला मास्ट सेल ऍक्टिव्हेशन सिंड्रोम (MCAS) नावाच्या दुर्मिळ क्रॉनिक रोगाचे निदान झाले. ज्यामुळे वारंवार गंभीर एलर्जीची लक्षणे तिला दिसून येतात.
उपचार खूप कठीण
क्रे यांनी सांगितले की, यावर उपचार होते, पण ते भावनिकदृष्ट्या खूप कठीण होते, कारण मला माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागले. हा आजार बरा होण्यासाठीचे नियम आणि उपचार हे कळल्यावर मी आणि माझी आई दोघेही रडत होतो अशा भावनाही क्रेने व्यक्त केल्या.
पार्टीला जातानही तिचे जेवण ती घेऊन जाते
क्रेने सांगितले की ती कुठे बाहेर पार्टीला वैगरे जातानाही तिचे खाद्य ती घेऊन जाते. पाच वर्षांपासून ती फक्त ओट्स आणि मुलांच्या फूड सप्लिमेंट्सवर अवलंबून आहे पण तरीही तिचे खाद्य ती एन्जॉय करत असल्याचं सांगते. क्रेच्या थेरपिस्टने तिला हळू हळू इतर अन्न खाऊन पाहण्याचा सल्ला दिला आहे.
याबाबत क्रे म्हणाली की “मी सध्या माझ्या MCAS थेरपिस्टसोबत वेगवेगळे पदार्थ ट्राय करत आहे. पण आतापर्यंत, चिकन, रताळे आणि ब्रोकोली असे काही पदार्थ मी खाऊन पाहण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी हे सर्व पदार्थ खाऊन मला कोणती अॅलर्जी होतेय का? आणि झालीच तर ती यांपैकी कोणत्या पदार्थामुळे झाली आहे. हे सर्व मी पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे.” असं म्हणत ती हळू हळू या आजाराशी सामना करायला तयार होत असल्याचं म्हटलं आहे.