देशातील असं एक राज्य… जिथे एकही कुत्रा नाही, सापही नाही; ‘या’ जीवघेण्या आजाराचा धोका शून्य

तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक असे राज्य आहे जिथे कुत्रा किंवा साप आढळत नाही. तर शेजारच्या राज्यात सर्वाधिक साप आढळतात. हे सुंदर राज्य मालदीवसारखे आहे. माशांच्या सहाशेहून अधिक प्रजाती येथे आढळतात. जाणून घेऊ कोणते आहे हे राज्य.

देशातील असं एक राज्य... जिथे एकही कुत्रा नाही, सापही नाही; 'या' जीवघेण्या आजाराचा धोका शून्य
dog Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 27, 2025 | 12:38 PM

लक्षद्वीप हे भारतातील अतिशय सुंदर बेट आहे. येथे निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच अनेक क्रीडा उपक्रमांचाही आनंद घेता येतो. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास वेळ घालवू शकता आणि अनेक अविस्मरणीय अनुभव देखील घेऊ शकता. लक्षद्वीप हे अगदी मालदीवसारखे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का इथे एक प्राणी ज्याला पाळणे सर्वांना आवडते त्यावर बंदी घालण्यात आली आहे. लक्षद्वीप मध्ये हा प्राणी तुम्हाला कुठेच दिसणार नाही.

हा प्राणी दुसरा कोणीही नसून कुत्रा आहे. जवळजवळ प्रत्येकालाच कुत्रा पाळायला खूप आवडते. कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र मानला जातो. पण लक्षद्वीप मध्ये तुम्हाला एकही कुत्रा दिसणार नाही. WHO च्या मते लक्षद्वीप देखील रेबीजमुक्त राज्य आहे. याशिवाय पर्यटकांना कुत्रे घेऊन येण्यास येथे बंदी करण्यात आली आहे. सरकारने लक्षद्वीप मध्ये पाळीव आणि बिगर पाळीव कुत्रे नेण्यास बंदी घातली आहे. मात्र लक्षद्वीप मध्ये मांजर आणि उंदीर मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे तुम्हाला सर्व रस्त्यांवर आणि रिसॉर्टच्या आजूबाजूला मांजरी आणि उंदीर दिसतील.

लक्षद्वीपमध्ये हा देखील प्राणी आढळत नाही

फक्त कुत्राच नाही तर इथे सापही तुम्हाला दिसणार नाहीम तसेच हे सर्पमुक्त राज्य आहे. लक्षद्वीपच्या वनस्पती आणि जीव जंतूंच्या मते लक्षद्वीप एकमेव राज्य आहे जिथे साप आढळत नाही. सापाबद्दल बोलायचे झाले तर भारतातील केरळमध्ये सापांच्या सर्वाधिक प्रजाती आढळतात. येथे विषारी सापांची संख्या ही जास्त आहे. हे लक्षद्वीपचे शेजारचे राज्य आहे.

माशांच्या आहेत 600 पेक्षा जास्त प्रजाती

लक्षद्वीपमध्ये मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे तुम्हाला माशांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतील. माहितीनुसार लक्षद्वीपमध्ये माशांच्या सहाशेहून अधिक प्रजाती आढळतात. फुलपाखरू मासा हा लक्षद्वीपचा राज्य प्राणी आहे. फुलपाखरू माशाच्या किमान अर्धा डझन प्रजाती येथे बघायला मिळतात.

एकूण लोकसंख्या सुमारे 64 हजार आहे

36 लहान बेटांनी बनलेल्या लक्षद्वीप ची एकूण लोकसंख्या सुमारे 64,000 आहे. तसेच 96 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. पर्यटन आणि मासेमारी हे लक्षद्वीप मधील उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे.

दहा बेटांवर राहतात लोक

लक्षद्वीप येथे 32 बेटे असूनही पण इथे फक्त दहा बेटांवर लोक राहतात. ज्यामध्ये कावरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलातन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय यांचा समावेश आहे. अशी अनेक बेटे आहेत जिथे 100 पेक्षा कमी लोक राहतात कावरत्ती येथील राजधानी आहे.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.