Baba Vanga Prediction : जगात असे काही लोक होते आणि काही अजूनही आहेत ज्यांचे अंदाज अनेक वेळा खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांच्या आता या जगात नसले तरी त्याचे अंदाज अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे अंदाज आतापर्यंत 85 टक्क्यांपर्यंत खरे ठरले आहेत. आता त्यांनी २०२४ या वर्षासाठी केलेले धक्कादायक दावेही समोर आले आहेत.
मिररच्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आणि स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. बल्गेरियातील बाबा वेंगा यांचे खरे नाव वेंगेलिया पांडेवा गुश्टेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) आहे. 1996 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
1980 मध्ये, बाबा वेंगा यांनी रशियाच्या कुर्स्क शहरात एका भयानक घटनेची भविष्यवाणी केल्याचा दावा केला. पाण्याखाली एखादी घटना घडेल आणि संपूर्ण जग त्यावर रडणार असल्याचा दावा त्यांनी केला. ऑगस्ट 2000 मध्ये त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचे सांगितले जाते. शहराजवळ आण्विक पाणबुडी बुडाल्याने एकूण 188 क्रू मेंबर्स मारले गेले. याशिवाय 1989 मध्ये त्यांनी 9/11 च्या हल्ल्याबाबतही भाकीत केले होते आणि म्हटले होते की, ‘अमेरिकेवर हल्ला होईल.
बाबा वेंगा यांनी 2024 साठी काही आश्चर्यकारकपणे भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. Astrofame नुसार, 2024 मध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्याच देशातील कोणीतरी हत्या करेल. याशिवाय 2024 मध्ये युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
बाबा वेंगा यांचा दावा आहे की, ‘मोठा देश’ पुढील वर्षी जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. याशिवाय बाबांनी असा दावाही केला आहे की, पुढील वर्षी मोठे आर्थिक संकट येणार असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता यातील एकही अंदाज खरा ठरतो की नाही हे पाहायचे आहे.