एवढुसा क्युट मुलगा, मारतोय धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट, कोहलीसारखा कव्हर ड्राइव्ह! व्हिडीओ शेअर कुणी केलाय ते तर पहा
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने बॅट हातात घेतली आहे. मुलगा आपल्या घरात नेटचा सराव करत आहे. या दरम्यान तो न बघता असे भन्नाट शॉट्स मारतोय कि बस्स. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कधी तो धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारतो, तर कधी कोहलीसारखा कव्हर ड्राइव्ह मारतो.
मुंबई: सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात मुलगा एखाद्या अनुभवी क्रिकेटपटूसारखा खेळताना दिसत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, ही अद्भुत प्रतिभा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या मुलाने आपल्या अप्रतिम फलंदाजीने बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनाही मोठे फॅन बनवले आहे. त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित हातात आहे.”
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने बॅट हातात घेतली आहे. मुलगा आपल्या घरात नेटचा सराव करत आहे. या दरम्यान तो न बघता असे भन्नाट शॉट्स मारतोय कि बस्स. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कधी तो धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारतो, तर कधी कोहलीसारखा कव्हर ड्राइव्ह मारतो. हा व्हिडिओ नेटिझन्सची मने जिंकत आहे. मुलाने इतकी चांगली फलंदाजी केली आहे की लोक लूपमध्ये व्हिडिओ पाहत आहेत.
View this post on Instagram
काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी आपले मत मांडले आहे. काहींचा दावा आहे की, हे मूल पाकिस्तानी आहे. यावर बिग बींचे चाहते उत्तर देत आहेत की, बच्चन साहेब बोलले तर त्यांना भारतात आणलं जाईल.