तहानलेल्या सापाला पाणी पाजणारा देवमाणूस!
सापही पाणी पितात हे तुम्हाला माहित आहेका? म्हणजेच सापांनाही माणसांप्रमाणे तहान लागते. आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ पाहा...
एकीकडे सापांच्या नावानं अनेक जण घाबरायला लागतात, तिथे न घाबरता सापांना मदत करण्यावर विश्वास ठेवणारे काही लोक आहेत. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सापांच्या अनेक प्रजाती आहेत, त्यातील बहुतांशींमध्ये विष नसते, पण काही साप इतके घातक असतात की, त्यांच्या विषाचा एक थेंब क्षणार्धात एखाद्याचा जीव नष्ट करण्यासाठी पुरेसा असतो.
सापही पाणी पितात हे तुम्हाला माहित आहेका? म्हणजेच सापांनाही माणसांप्रमाणे तहान लागते.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती धोकादायक किंग कोब्राला पाणी देताना दिसत आहे. कोब्रा ज्या पद्धतीने पाणी पितो आहे, त्यावरून असे दिसते की सापाला खूप तहान लागली होती.
बाटलीतून सापाला पाणी देणाऱ्या या व्यक्तीचे वर्तन पाहून अनेक जण प्रभावित झालेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ आतापर्यंत तो हजारो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
View this post on Instagram
कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक त्या माणसाला शूर म्हणताना दिसत होते. काहींनी त्या माणसाला पाहिले आणि म्हणाले की माणुसकी अजूनही शिल्लक आहे.