सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पाहायला मिळत आहे. ही 15 सेकंदाची क्लिप तुमचेही लक्ष विचलित करू शकते, कारण हे प्रकरण आत्महत्येच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. व्हायरल क्लिपमध्ये एक महिला आपल्या मुलाला घेऊन पुलावरून नदीत उडी मारण्यासाठी जात होती. पण दुसऱ्याच क्षणी चमत्कार घडतो आणि दोघांचेही प्राण वाचतात. एक बसचालक प्रचंड चपळाई दाखवत शेवटच्या क्षणी त्या बाईला पकडतो आणि तिला उडी मारू देत नाही. आता हा व्हिडिओ बघून सर्वजण बस चालकाचं कौतुक करत आहेत.
व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला आपल्या मुलाचा हात धरून पुलावरून जात आहे. त्याचबरोबर खालून एक नदी वाहत आहे. महिला वारंवार चेहऱ्यावर हात फिरवते. असे दिसते की ती एखाद्या गोष्टीबद्दल दु: खी आहे आणि रडत आहे.
या व्हिडीओमध्ये एक बसही महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. ज्याच्या ड्रायव्हरला बहुधा कल्पना आली असेल की काहीतरी गडबड आहे.
Hero Driver pic.twitter.com/FLEY85d6yY
— Figen (@TheFigen_) November 11, 2022
ही महिला पुलावरून नदीत उडी मारण्याच्या बेतात असताना बसचालकाने दरवाजा उघडून तिला तात्काळ पकडले.आपण पाहू शकता की ड्रायव्हर बस थांबवतो आणि पटकन दरवाजा उघडतो आणि महिला आणि मुलाला नदीत उडी मारण्यापासून वाचवतो.
मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण बसचालकाचे फॅन झाले आहेत. त्याला हिरो म्हणत नेटकरी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत.
त्याचबरोबर काही युझर्सचा हा व्हिडिओही स्क्रिप्टेड दिसत आहे. त्यामागे लोक लॉजिकही देत आहेत. हे प्रकरण जुने असेलही, पण ज्या पद्धतीने बसचालकाने समज देऊन त्या महिलेचे आणि तिच्या मुलाचे प्राण वाचवले आहेत, ते पाहण्यासारखे आहे.