Video: अरेरे, शत्रूसोबतही असं घडू नये! McDonald’s मध्ये काऊंटरच्या रांगेत असताना तिला केलं प्रपोज अन्..

एका तरुणाने प्रपोज करण्यासाठी अत्यंत हटके पर्याय अवलंबला. मात्र त्यानंतर काय झालं, हे पाहिल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल. हा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Video: अरेरे, शत्रूसोबतही असं घडू नये! McDonald’s मध्ये काऊंटरच्या रांगेत असताना तिला केलं प्रपोज अन्..
McDonald’s मध्ये काऊंटरच्या रांगेत असताना तिला केलं प्रपोज अन्..Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:26 AM

आपण जिच्यावर प्रेम करतो, तिला प्रपोज करतानाचा क्षण अविस्मरणीय व्हावा यासाठी अनेकजण विविध युक्त्यांचा विचार करतात. सर्वांत हटके प्रपोज (Propose) कसं करता येईल, यासाठी मित्रमंडळींकडूनही सल्ले घेतले जातात. त्यातही ते प्रपोजल सरप्राइज ठरणारं असेल तर प्रेयसीची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष असतं. अशाच एका तरुणाने प्रपोज करण्यासाठी अत्यंत हटके पर्याय अवलंबला. मात्र त्यानंतर काय झालं, हे पाहिल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल. हा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडीओतील तरुणाने मॅकडॉनल्ड्सच्या (McDonald) रांगेत उभं असताना आपल्या पुढील महिलेला सर्वांसमोर प्रपोज केलं. सार्वजनिक ठिकाणी प्रपोज करताना प्रेयसी किंवा एखादी महिला आपल्याला होकार देईल याची खात्री मात्र नक्की असावी. नाहीतर मग पुढे काय घडेल हे सांगता येत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, एक महिला मॅकडॉनल्ड्सच्या फूड काऊंटरवर उभी राहून तिची ऑर्डर देताना दिसतेय. तिच्यामागे बरीच मोठी रांग आहे. रांगेत तिच्याच मागे उभा असलेला एक तरुण अचानक हातात अंगठीचा बॉक्स घेऊन गुडघ्यांवर बसू लागतो. सुरुवातील ती महिला त्याकडे दुर्लक्ष करते. मात्र त्याठिकाणी उपस्थित असलेले इतर लोक जेव्हा तिला होकार देण्यासाठी चिअर करत असतात तेव्हा ती रागाने नकारार्थी मान हलवते. इतरांकडूनही होकारासाठी दबाव होत असल्याचं पाहत ती त्याच्याशी भांडते आणि थेट तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर तो तरुणही तिथून निघून जातो. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग याठिकाणी ही घटना घडल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ आणि त्यावरील प्रतिक्रिया-

सोशल मीडियावरील या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘मुलीने होकार द्यावा यासाठी मुद्दाम सार्वजनिक ठिकाणी प्रपोज केलं जातं’, असं एका युजरने म्हटलं. तर काहींनी या व्हिडीओला प्रँक असल्याचं म्हटलंय. पब्लिक प्रपोज करण्याचा तोटा, असंही एकाने लिहिलंय.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.