मुंबई: गेल्या काही दिवसांत हवामानात इतका बदल झाला आहे की, देशातील काही भागात लोकांना तीव्र उष्णतेच्या सामोरे जावे लागत आहे. दिल्ली-एनसीआरपासून यूपी-बिहारपर्यंत येथील लोकांची उन्हामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. परिस्थिती अशी आहे की कडक उन्हात काही लोक चुलीशिवाय ऑमलेट बनवताना दिसतायत. आता सोशल मीडियावरही याची चर्चा सुरू आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या भागात उष्णतेचा कहर कसा होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
पश्चिम बंगालमध्येही लोक उष्णतेच्या लाटेशी झगडत आहेत. अहवालानुसार इथे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालये आठवडाभर बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने घरी एक प्रयोग केला, ज्यावरून इथलं हवामान किती गरम आहे हे दिसून येतं. व्हायरल क्लिपमध्ये ब्लॉगर पुचू बाबू घराच्या छतावर चुली शिवाय पॅनमध्ये ऑमलेट बनवताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की ब्लॉगर छताच्या रेलिंगवर पॅन ठेवतो. थोड्याच वेळात कढई इतकी गरम होते की त्यात अंडी फोडून टाकताच ऑमलेट तयार होते. व्हिडिओच्या शेवटी, आपण ब्लॉगर ऑमलेट खाताना देखील पाहू शकता.
फेसबुकवर @puchubabuchandrani नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ब्लॉगर पुचू बाबू यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाहा 46 डिग्री तापमानात छतावर ऑमलेट कसे बनवले जाते.” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.