व्हायरल व्हिडीओ बघून एकच गोंधळ,”अभिनेता सुशांत सिंह राजपूत?”
या व्हिडिओचे अनेक चाहत्यांकडून कौतुक होत आहे. अनेक नेटिझन्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, "हॅलो, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे कारण सुशांत सिंह राजपूत माझा आवडता अभिनेता होता."
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने जगभरातील त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आजही त्याची आठवण येताच चाहते भावूक होतात. मात्र सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना समोर आली, ज्यामुळे इंटरनेट युजर्स विचारात पडले. एक अशी व्यक्ती ज्याचे रूप दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसारखेच आहे. हा हुबेहूब सुशांत सिंह वाटणारा याचं खरे नाव डोनिम आर्यन आहे. आर्यनचा चेहरा हुबेहूब सुशांत सिंह राजपूतसारखेच आहे. त्याचे व्हिडीओ बघून लोकं शॉक झालेत.
आर्यनचा व्हिडिओ पाहून लोक त्याला फॉलो करत आहेत. तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुशांतच्या गाण्यांचे आणि चित्रपटांचे सीन रिक्रिएट करणारे व्हिडिओ पोस्ट करत आहे. आर्यनचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. आर्यनचे हावभाव आणि शरीरयष्टी पूर्णपणे सुशांतसारखीच आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय होत आहेत. सुशांतच्या जुन्या आठवणी चाहत्यांमध्ये ताज्या झाल्या. महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक, ‘केदारनाथ’, ‘काई पो छे’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिनेत्याच्या भूमिका आजही लोकांना आठवतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
या व्हिडिओचे अनेक चाहत्यांकडून कौतुक होत आहे. अनेक नेटिझन्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “हॅलो, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे कारण सुशांत सिंह राजपूत माझा आवडता अभिनेता होता.”