लोकांना प्रश्न पडतोय हा फोटो नेमका आहे कुठला? Heart Shape वाला Signal होतोय व्हायरल
हे फोटो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. लोक विचार करतायत हा फोटो नेमका कुठला? कोणत्या शहराचा?
विचार करा सिग्नल जर हार्ट शेप चा असेल तर? सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ट्रॅफिक लाईट्स हृदयाच्या आकाराचे दिसतात. ते अतिशय सुंदर दिसतात. हे फोटो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. लोक विचार करतायत हा फोटो नेमका कुठला? कोणत्या शहराचा?
हा फोटो आहे बंगळुरू, कर्नाटक मधला. बंगळुरुला ‘हार्ट स्मार्ट सिटी’मध्ये रुपांतरित करण्यासाठी, या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी इथल्या रस्त्यांवरील काही ट्रॅफिक लाईट्स हृदयाच्या आकारात बदलण्यात आले आहेत.
बंगळुरूतील अनेक ट्रॅफिक लाईट्स 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान लाल हृदयाचा आकार दाखवतील, असे सांगण्यात येतंय.
याची छायाचित्रेही एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलीयेत. माहितीनुसार, बंगळुरूमध्ये हृदयाच्या आरोग्याबाबत जागरुकता वाढावी यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
अनेक रस्त्यांवरील ट्रॅफिक लाइटमध्ये हार्ट शेप सिम्बॉलचा वापर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणारे, जेणेकरून टेक सिटीचे ‘हार्ट स्मार्ट सिटी’मध्ये रुपांतर होण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.
जागतिक हृदय दिनानिमित्त या मोहिमेचा एक भाग मोहिमेअंतर्गत शहरात 20 सिग्नल तयार करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.
शहरातील 15 हून अधिक ठिकाणी सिग्नल्स बंद ठेवण्यात आले होते. हृदयाच्या आकाराच्या चिन्हांमध्ये रूपांतर करण्यासाठी ते सिग्नल्स बंद ठेवण्यात आले होते.