सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरं तर सोशल मीडियाचा खरा वापर तेव्हाच होतो जेव्हा त्यावर टॅलेंट दाखवलं जातं. अनेक तरुण मंडळी आज या माध्यमातून आपलं टॅलेंट दाखवत असतात. जे टॅलेंट फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतं. असाच एक व्हिडीओ आहे ज्यात या मुलानं एक अशी गाडी बनवलीय जी बघून तुम्हाला चक्कर येईल.
विचार करा एक अशी गाडी जी बनविण्यासाठी खर्च फक्त १० ते १२ हजार असेल. ज्या गाडीचा मेंटेनन्स ८ ते १० रुपये असेल. तब्बल ६ जण एकावेळी त्यावर बसू शकतील. आहेना आश्चर्य करणारं?
हा व्हिडीओ बघा…सायकलचा फिल देणारी ही गाडी या मुलाने फक्त १० ते १२ हजार रुपयात बनवली. चार्जिंग वर चालणारी ही गाडी ८ ते १० रुपयात चार्ज होते.
एकदा जर ही गाडी चार्ज केली तर ही १५० किलोमीटर चालते. हा खरा देशी जुगाड म्हणायचा.
‘asadabdullah62’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.
८ लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळालेत. २ कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. ही भन्नाट गाडी लोकांना प्रचंड आवडलाय.