ऑफिसचा शेवटचा दिवस कसा असतो हे दाखवणारा परफेक्ट व्हिडीओ!
सोशल मीडियावर एका व्यक्तीने या दिवसाचे सुंदर वर्णन करणारा एक व्हिडिओ शेअर केलाय.
राजीनामा दिल्यानंतर नोटीसचा कालावधी पूर्ण करून ऑफिसमधून बाहेर पडण्याचा शेवटचा दिवस येतो तेव्हा अनेक लोक आनंदी असतात आणि काही जण भावनिक होतात! बऱ्याच गोष्टींचं सोडून जाण्याचं त्याला दु:ख वाटतं, जसे की लॅपटॉप, डेस्क, चहा-सिगारेट वाला आणि ऑफिसच्या बाहेर सुरक्षा रक्षक इत्यादी. खरं तर ऑफिसचा शेवटचा दिवस म्हणजे या सगळ्यांचा निरोप घेण्याचा दिवस असतो. सोशल मीडियावर एका व्यक्तीने या दिवसाचे सुंदर वर्णन करणारा एक व्हिडिओ शेअर केलाय.
हा सगळा सीन रजनीकांतच्या ‘शिवाजी द बॉस’ या सिनेमातील एका सीनवर फिट करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हीही असंच म्हणाल – माझ्याबाबतीतही असंच झालं आहे.
हा व्हिडिओ ट्विटर युजरने @yenceesanjeev शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी असे काहीतरी घडते.
या ट्विटला 14 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, 1500 हून अधिक रिट्विट आणि व्हायरल क्लिप्सला 4 लाख 15 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
Last day scenes in office be like pic.twitter.com/kKHwuw2tfn
— Sanjeev NC (@yenceesanjeev) November 30, 2022
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सला कमेंट करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. एका युझरने लिहिले की, मी स्वत:ला यात पाहू शकतो. दुसऱ्याने लिहिले की, ऑफिसच्या बाहेरचा चहावाला गायब आहे.