बघा मॅडमचे ड्रायव्हिंग स्किल्स बघा! नजर ना लगे भाई
आजकाल लोक बाईक ऐवजी स्कूटी चालवण्यास प्राधान्य देतात. पण काही जणांचं तर स्कूटीचं ड्रायव्हिंग पण खराब आहे.
गाडी चालवणं हे काही सोपं काम नाही, मग ते बाइक असो वा कार. गाडीपेक्षा बाइक चालवणं थोडं सोपं असलं तरी यातही नवीन ड्रायव्हर्स कधी कधी ब्रेक, गिअर्स, क्लच आणि ॲक्सिलेटरमध्ये अडकून पडतात आणि एक तर कुठेतरी जाऊन धडकतात किंवा स्वत:च चूक करून पडतात. आजकाल लोक बाईकऐवजी स्कूटी चालवण्यास प्राधान्य देतात. पण काही जणांचं तर स्कूटीचं ड्रायव्हिंग पण खराब आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच हसवेल.
खरं तर या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने महिलेने स्कूटी चालवली आहे, त्यावरून तुम्ही तिच्या ड्रायव्हिंग कौशल्यावर संशय घ्याला. तुम्हाला प्रश्न पडेल की, तिला ड्रायव्हिंग लायसन्स कोणी दिलं?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला दोन्ही पाय खाली ठेवून स्कूटी चालवत होती, तर रस्ता पूर्णपणे रिकामा होता, ट्रॅफिक नव्हतं.
गाडी चालवत असताना ती एका चौकात पोहोचते, तिथून एक कारचालक हळूहळू तिथून आपली गाडी काढत असतो आणि ती महिला सरळ जाऊन तिच्या गाडीला धडकते.
समोरून गाडी येत असल्याचं तिला दिसतं, पण एवढं करूनही ती स्कुटीला ब्रेक लावत नाही आणि थेट गाडीला जाऊन धडकते. आता अशी ड्रायव्हिंग स्किल्स पाहून हसायला नाही येणार मग काय होईल.
‘दीदी’चा हा मजेशीर ड्रायव्हिंग स्किल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर psycho_biihari नावाच्या आयडीसोबत शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 54 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
View this post on Instagram
त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रकारच्या मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने या महिलेचं वर्णन ‘जीवघेणा ड्रायव्हर’ असं केलं आहे.