अगंबाई ढगोबाई “सासूबाई” काय “कमाल बाई”! अशी सासू सगळ्यांना मिळावी
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल आणि तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
सासू-सून यांच्यातील वादाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतीलच, पण या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेलं बॉण्डिंग तुम्ही कधी पाहिलं नसेल. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल आणि तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
या व्हिडीओमध्ये सासू स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच वेळी सून साडी नेसून किचनसमोर नाचते.
दीपिका पदुकोणवर चित्रीत केलेल्या ‘लत लग गई’ या गाण्यावर सून नाचू लागते. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडिओ तुम्हीही अवश्य पाहा…
नाचताना सून सासूकडे जाऊन नाचू लागते. त्याचबरोबर सासूबाईही खूप मस्त हसून प्रतिक्रिया देतात. आपल्या सुनेचा डान्स पाहून सासूबाई हसू लागतात.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सासूच्या प्रतिक्रियेची वाट बघा. मी जशी आहे तशीच त्यांनी मला स्वीकारले आहे. असे आई-वडील आणि कुटुंबीय धन्य आहेत.
View this post on Instagram
सासू आणि सून या जोडीने लोकांचं खूप मनोरंजन केलं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसतायत.