जगातली सगळ्यात लांब नाकाची व्यक्ती! 250 वर्षांचा रेकॉर्ड, फोटो बघा
आज 250 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. परंतु आजपर्यंत हा विक्रम मोडणे किंवा त्याच्या आसपास पोहोचणे कोणालाही जमलेले नाही.

अनेकदा आपण पाहतो की बरीच मुलं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह जन्माला येतात. कुणाचं डोकं मोठं असतात, कुणाचा रंग वेगळा असतो, कुणाचे डोळे वेगवेगळे प्रकार असतात. मात्र एखादा जर खूप वेगळा असला तर तो जास्त दिवस जगू शकत नाही असं म्हटलं जातं. अशी उदाहरणं तुम्ही पाहिलंत का? अशा लोकांचे शारीरिक स्वरूप इतके विचित्र असते की, त्यांना पाहून लोक विचारात पडतात.
तुम्हाला जगातील सर्वात उंच किंवा सर्वात लहान व्यक्तीबद्दल माहिती असेल, परंतु जगातील सर्वात लांब नाक असणारी व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का?
इतिहासाच्या पानांमध्ये या व्यक्तीचं नाव आहे. कारण त्याच्याएवढं लांब नाक कोणत्याही व्यक्तीला नाही. आता त्याचं नाक किती मोठं असेल हे याचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकता.
जगातील सर्वात लांब नाक असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे थॉमस वेडर्स, ज्याला थॉमस वैडहाउस असंही म्हटलं जातं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आज 250 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. परंतु आजपर्यंत हा विक्रम मोडणे किंवा त्याच्या आसपास पोहोचणे कोणालाही जमलेले नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या व्यक्तीचे नाक 7.5 इंच (19 सेमी) लांब होते. इ.स.१७७० या काळात ते इंग्लंडमध्ये सर्कसमध्ये कलाकार म्हणून काम करत होते. आजकाल सोशल मीडियावर या विचित्र व्यक्तीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे.
खरं तर, अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @historyinmemes नावाच्या आयडीसह एक फोटो शेअर करण्यात आला आहे, जो संग्रहालयात ठेवलेल्या मेणाचा पुतळा आहे. हा पुतळा थॉमस वेडर्सचा आहे.
Thomas Wadhouse was an English circus performer who lived in the 18th century. He is most famously known for having the world’s longest nose, which measured 7.5 inches (19 cm) long. pic.twitter.com/Gx3cRsGXxd
— Historic Vids (@historyinmemes) November 12, 2022
थॉमसचं नाक किती मोठं होतं ते चित्रात तुम्ही पाहू शकता. या फोटोला आतापर्यंत एक लाख 20 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर 7 हजारहून अधिक लोकांनी ही पोस्ट रिट्विटही केली असून युजर्सनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कुणी म्हणतंय की हा माणूस कधीही न हरणारा वंश म्हणूनही ओळखला जातो, तर कुणी गंमतीने ‘हा माणूस चेटकिणींच्या गावात जन्माला आला होता का?’, असा प्रश्न विचारत आहे.
त्याचबरोबर आणखी एका युझरने ‘त्या काळात कोरोना आला असता तर या माणसाने काय केलं असतं जरा विचार करा’ असं लिहिलं आहे.