Video | मादीला मिळवण्यासाठी तीन सापांमध्ये जुंपली, भांडण सोडवण्यासाठी सर्पमित्राला घ्यावी लागली मेहनत
एका तरुणीसाठी तरुणांमध्ये भांडण झाल्याचे आपण यापूर्वी अनेकवेळा पाहिले असेल. तसे अनेक किस्से चर्चेत आलेले आहेत. पण एका मादीसाठी चक्क तीन सापांनी आपल्या जिवाची बाजी लावल्याचा प्रसंग नुकताच समोर आला आहे.
मुंबई : एका तरुणीसाठी तरुणांमध्ये भांडण झाल्याचे आपण यापूर्वी अनेकवेळा पाहिले असेल. तसे अनेक किस्से चर्चेत आलेले आहेत. पण एका मादीसाठी चक्क तीन सापांनी आपल्या जिवाची बाजी लावल्याचा प्रसंग नुकताच समोर आला आहे. एका मादीसाठी चक्क तीन सापांनी जोरदार भांडण केले असून यामध्ये ते जखमीदेखील झाले आहेत. ऑस्ट्रोलियामध्ये ही घटना घडली असून 7 news ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
घरात तीन साप एकमेकांशी भांडत असलेले दिसले
7 news ने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट या भागात एका महिलेचे घर आहे. या मिहलेचे नाव सोफी कॉलेंड असून तिला घरात तीन साप एकामेकांना बिलगल्याचे अचानकपणे दिसले. एकमेकांना वेटोळे घालून ते भांडत होते. हा सर्व प्रसंग पाहून सोफी कॉलेंड सुरुवातीला घाबरून गेली. त्यानंतर तिने तत्काळ सर्पमित्रांना फोन केला.
तीन सापांचे भांडण हा दुर्मिळ प्रसंग
सोफी कॉलेंड यांच्या फोननंतर सापांना रेस्क्यू करण्यासाठी सर्पमित्र हजर झाला. तसेच तिन्ही साप एकमेकांशी लढताना पाहून तोसुद्धा आश्चर्यचकित झाला. एका मादीला मिळवण्यासाठी त्यांची ही लाढाई सुरु होती. वाइल्ड एन्काऊंटर्स टीमने हा व्हिडीओ नंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साप एकमेकांसोबत कमी प्रमाणात राहतात. प्रजनन करताना ते एकत्र येतात. त्यामुळे तीन सापांचे हे भांडण दुर्मिळ प्रसंग म्हणावा लागेल.
पाहा व्हिडीओ :
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
दरम्यान, एखाद्या मादीला मिळवण्यासाठी सापांची लढाई कमी प्रमाणात पाहायला मिळते. मात्र या व्हिडीओमध्ये मादीला मिळवण्यासाठी चक्क तीन साप भांडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या तीन सापांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी सर्पमित्रांनादेखील मोठी मेहनत घ्यावी लागली. पण विशेष म्हणजे या सापांच्या भांडणात मादी सापाने मात्र तेथून पळ काढला होता. नंतर महिलेच्या घरातून उचलून तिन्ही सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
इतर बातम्या :
बहिणीसाठी भावाचा स्वीटहार्ट डान्स, नेटकरी म्हणाले, डान्स पाहून आम्हाला सुशांतसिंहची आठवण झाली
सोशल मीडियावर पुन्हा #ghostphotochallenge ट्रेंड, नेटकऱ्यांकडून भूतांच्या पेहरावातले फोटो पोस्ट
IND Women vs AUS Women : दुसऱ्या दिवशी पावसाचा पुन्हा व्यत्यय, मानधनाचं शतक, भारत मजबूत स्थितीत#AUSvIND #SmritiMandhana #INDWvAUSW https://t.co/S69ufWTU8L
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
(three male snake fight for one female snake video went viral on social media)