Video: 3 तोंडांच्या सापाचा फोटो पाहून नेटकरी घाबरले, पण खरं समजल्यावर विश्वास ठेवणं अवघड, पाहा निसर्गाचा अद्भूत चमत्कार

सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात 3 शिर असलेला साप दिसत आहे. मात्र, हा 3 शीर असलेला साप नसून निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे

Video: 3 तोंडांच्या सापाचा फोटो पाहून नेटकरी घाबरले, पण खरं समजल्यावर विश्वास ठेवणं अवघड, पाहा निसर्गाचा अद्भूत चमत्कार
हा फोटो पाहून कुणालाही 3 तोंडं असलेल्या सापाचा भास होतो.
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 5:19 PM

निसर्गात असे अनेक आश्चर्य आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकल्यावर आपल्याला विश्वास बसत नाही. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात 3 शिर असलेला साप दिसत आहे. मात्र, हा 3 शीर असलेला साप नसून निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे, हा साप नाही तर आहे तरी काय हेच आपण आज पाहाणार आहोत. या फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, आणि लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. (Three mouth snake photo goes viral on social media)

फोटोत दिसणारा हा 3 तोंडाचा साप नसून, जगातील सर्वात मोठं फूलपाखरु आहे. कदाचित हे ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसला नसेल, पण हे खरं आहे. एटाकस एटलस (Attacus Atlas) नावाचं हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वात सुंदर फूलपाखरु आहे. फूलपाखरं हे किटकांच्या प्रजातीत येता, ज्यात अळीचा विकास होऊन फूलपाखरु तयार होतं. फूलपाखरु झाल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात हे प्रजननाचा काळ पूर्ण करते, मादा अंडी घालते आणि त्यानंतर ते मरतं. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत हे निसर्गात असे काही रंग उधळतं, की पाहणारे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही.

पाहा फोटो:

या फूलपाखराच्या दोन्ही पंखाच्या टोकांना सापाच्या तोंडासारखे आकार असतात. शिवाय त्याचं डोकंही साप असल्याचाच भास देतं. या फूलपाखराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. जेव्हा या फूलपाखराला कुणापासूनही धोका वाटतो, तेव्हा तो पंख फडफडवतो, आणि साप असल्याचा भास निर्माण करतो, त्यामुळे समोरचा शिकारी घाबरतो, आणि तिथून निघून जातो. हे फूलपाखरु थायलंडच्या जंगलात सापडतं.

थायलंडमध्पे सापडणाऱ्या सर्वात मोठ्या फूलपाखराचा व्हिडीओ:

सोशल मीडियात सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काहींना खरंच हा 3 तोंडांचा साप वाटतो आहे. तर ज्यांना हे कळतं आहे की हे फूलपाखरु आहे, त्यांचा यावर विश्वास बसत नाही आहे. तुम्हाला या फूलपाखराबद्दल माहित होतं का? आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

हेही पाहा:

Video: गळात किंग कोब्रा घेऊन सर्पमित्राचे स्टंट, लोक म्हणाले, बाबा जपून, सापाचा काही भरवसा नसतो!

Video: हल्ला करणाऱ्या कुत्र्यावर वाघाची मावशी भडकली, मांजरीचा रुद्रावतार पाहून नेटकरी लोटपोट

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.