Video | वाघाने गाईला चपळाईने पकडलं, जंगलात फरफटत नेण्याचा प्रयत्न, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वाघाने गाईवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर ही घटना घडली. या मार्गावरून कारने ताडोबाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाने हे दृश्य कॅमेर्‍यात कैद केलं आहे.

Video | वाघाने गाईला चपळाईने पकडलं, जंगलात फरफटत नेण्याचा प्रयत्न, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद
TIGER ATTACK ON COW
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 12:31 PM

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वाघाने गाईवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर ही घटना घडली. या मार्गावरून कारने ताडोबाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाने हे दृश्य कॅमेर्‍यात कैद केलं आहे.

गाईला जबड्यात पकडून जंगलात ओढत नेण्याचा प्रयत्न

अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत तिची शिकार करण्याचा प्रयत्न केलाय. तसे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्याच्या अगदी कडेला घडलेल्या या थराराने ताडोबाकडे निघाले पर्यटक क्षणभर थबकले होते. जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांच्या सीमावर्ती भागात कित्येकदा अशा घटना घडतात. मात्र हा थरार लाइव्ह कॅमेऱ्यात कैद होत वायरल झाल्याने त्याची चर्चा होत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गाय वाघाच्या कचाट्यात सापडल्याचे दिसतेय. वाघाने गाईच्या मानेला गच्च पकडले आहे. तसेच आपल्या जबड्यात पकडून वाघ गाईला जंगलातून खेचून नेण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसरीकडे गाय वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतेय. हा सर्व थरारक कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पर्यटनासाठी निघालेल्या एका कुटुंबाने हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शेवटी कारमधील लोकांना पाहून वाघ थोडा थबकला आहे. त्याने जखमी झालेल्या गायीला सोडून दिले आहे. वाघाच्या तावडीतून सुटताच गाय अडखळत-अडखळत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

इतर बातम्या :

Video | ना वाजंत्री, ना डीजे, तरी आनंदी अनंद गडे, नवरी-नवरदेवाचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | स्टंटबाजी महागात ! मगरीच्या तोंडात हात घातला अन् भलतंच घडलं, थरारक व्हिडीओ व्हायरल

VIDEO : लळा लागला… मांजरीचं पिल्लू मालकिनीला घराबाहेर पडू देईना, नेटकरी म्हणतात, क्यूट व्हिडीओ!

(tiger attack on cow in chandrapur district video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.