फॅशन डिझायनरने डिझाइन केला अंबानींच्या शाळेचा गणवेश, तर प्रसिद्ध शेफने ठरवला कँटीनचा मेन्यू

नीता अंबानी यांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये केली. या शाळेत बॉलिवूड सेलिब्रिटी, आयएएस अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांची मुलं शिकतात. नुकताच या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. त्यातील व्हिडीओंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

फॅशन डिझायनरने डिझाइन केला अंबानींच्या शाळेचा गणवेश, तर प्रसिद्ध शेफने ठरवला कँटीनचा मेन्यू
Dhirubhai Ambani International SchoolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 11:16 AM

मुंबई : 26 डिसेंबर 2023 | धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि महागडी शाळा आहे. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामुळे ही शाळा सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. कारण या वार्षिक कार्यक्रमाला बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्यापासून ते शाहरुख खानचा मुलगा अबरामपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकत आहेत. तर काहींनी या शाळेत शिक्षण पूर्ण केलं आहे. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर आएएस अधिकारी, प्रतिष्ठित व्यावसायिक यांचीही मुलं अंबानीच्या शाळेत शिकतात. अंबानींच्या शाळेतील कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहिल्यानंतर या शाळेची फी किती असेल, तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार किती असेल याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

धीरुभाई अंबानींच्या शाळेतील प्रत्येक गोष्ट अत्यंत खास आहे. या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा गणवेशसुद्धा देशातल्या सर्वांत प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाइन केला आहे. हा डिझायनर दुसरा तिसरा कोणी नसून मनिष मल्होत्रा आहे. तर शाळेतल्या कँटीनचा मेन्यू शेफ संजीव कपूरने खास तयार केला आहे. नीता अंबानी यांनी 2003 मध्ये या शाळेची स्थापना केली. देशातल्या अनेक नामवंत आणि मोठ्या व्यक्तींच्या योगदानामुळे ही शाळा आता चर्चेत आली आहे. या शाळेतील प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने ठरवली गेली आहे. अंबानींच्या शाळेचं गीत जावेद अख्तर यांनी लिहिलं असून शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने ते संगीतबद्ध केलंय.

हे सुद्धा वाचा

शाळेत आराध्या बच्चनचा परफॉर्मन्स

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही तब्बल एक लाख 30 हजार चौरस फुटांवर पसरली असून शाळेची इमारत सात मजली आहे. या शाळेत आराध्या बच्चन, अबराम खान, करण जोहरची दोन्ही मुलं यश आणि रुही, शाहीद कपूरची मुलं, करीना कपूरचा मुलगा तैमुर हे सर्वजण याच शाळेत शिक्षण घेत आहेत.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.