Video | डोक्यावरुन ट्रॅक्टर जाऊनही सुरक्षित, एका हेल्मेटने वाचवलं, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय थरारक आहे. या व्हिडीओमध्ये एका दुकाकीस्वाराचा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा अपघात झालाय. हा अपघात अतिशय भीषण आहे.

Video | डोक्यावरुन ट्रॅक्टर जाऊनही सुरक्षित, एका हेल्मेटने वाचवलं, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
accident viral video
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 6:06 PM

मुंबई : आपल्या देशात रोजच अनेक अपघात होतात. यातील काही अपघात तर अतिशय भीषण असतात. काही अपघातांना आपण कित्येक दिवस विसरत नाही. एका रिपोर्टनुसार देशात दरवर्षी 4.5 लाख अपघात होतात. या अपघातामध्ये दरवर्षी जवळपास 1.5 लाख प्रवाशांचा मृत्यू होतो. याच कारणामुळे वाहने सावकाश चालवावीत तसेच वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवहान हमखास केले जाते. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा असेही आवर्जून सांगण्यात येते. हेल्मेटचे महत्त्व सांगणारा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (tractor trolley crossed over head bike rider horrifying video went viral on social media)

खड्ड्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय थरारक आहे. या व्हिडीओमध्ये एका दुकाकीस्वाराचा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा अपघात झालाय. हा अपघात अतिशय भीषण आहे. दुचाकीस्वाच्या मागे एक महिला तसेच एक छोटे मूल बसलेले आहे. हे तिघेही प्रवास करत आहेत. प्रवास करताना समोर पाणी असल्यामुळे दुचाकीस्वाराला खड्ड्याची कल्पना आलेली नाही. याच खड्ड्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला आहे.

डोक्यावरुन ट्रॅक्टरचे चाक गेले 

दुचाकीस्वाराच्या समोरून एक ट्रॅक्टर चालल्याचं आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. या ट्रॅक्टरचे चाक थेट दुचाकीस्वाराच्या डोक्यावरुन गेले आहे. हा भीषण अपघात पाहून दुचाकीस्वाराचा नक्कीच मृत्यू झाला असावा, असे आपल्याला वाटते. मात्र, खाली पडलेल्या माणसाच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. ट्रॅक्टरचे चाक माणसाने घातलेल्या हेल्मेटवरुन निसटले आहे. तसेच हेल्मेटमुळे दुचाकीस्वाराला इजा झालेली नाही. थोडक्यात हेल्मेट असल्यामुळे दुचाकीस्वारचे प्राण वाचले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. त्याला पाहून नेटकरी अचंबित झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सध्या हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनन शेअर केला आहे.

इतर बातम्या :

महिला स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानी मीडियाचा बुरखा फाटला, तालिबान्यांच्या समर्थनार्थ महिला अँकरने लाईव्ह शोमध्येच हिजाब घातला!

Video | बायकोच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, पण मध्येच घोळ झाला, पतीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO : महिलेची Cute डॉल्फिनसोबत मस्ती, व्हिडीओ पाहून उमटेल चेहऱ्यावर हसू…

(tractor trolley crossed over head bike rider horrifying video went viral on social media)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.