Video: यूपीत वाहतूक पोलिसांची दबंगगिरी, तरुणाला जखमी करणाऱ्या पोलिसाला नागरिकांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल

संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलिसाला मारहाण केली. त्यात त्याचा गणवेश फाटला. पोलीस कर्मचाऱ्याची तैनाती हातरसमध्ये असल्याची माहिती मिळते आहे.

Video: यूपीत वाहतूक पोलिसांची दबंगगिरी, तरुणाला जखमी करणाऱ्या पोलिसाला नागरिकांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल
यूपीत ट्राफिक पोलिसाला मारहाण
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 1:28 PM

अलीगढच्या (Aligarh) गांधीपार्क भागात रविवारी रात्री उशीरा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला (Traffic Police) मारहाण करण्यात आली आग्रा रोडवरील दुबेचा स्टॉपवर हा सगळा प्रकार घडला. टेम्पोच्या भाड्यावरून पोलीस कर्मचारी आणि टेम्पो चालकात वाद झाला. याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला मारहाण करुन जखमी केले. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलिसाला मारहाण केली. त्यात त्याचा गणवेश फाटला. पोलीस कर्मचाऱ्याची तैनाती हातरसमध्ये असल्याची माहिती मिळते आहे. घटनेच्या वेळी तो ड्युटीवरुन घरी चालला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Traffic police beaten up by locals in Aligarh, Uttar Pradesh, video goes viral)

हा सगळा प्रकार अलीगढच्या भर बाजारात झाला. ससनीगेटकडून येणाऱ्या टेम्पोमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी गणवेशात होता. तो मदारगेट तिराहेजवळ उतरला, तेव्हा त्याला टेम्पो चालकाने भाडं मागितलं. भाडं मागताच, हा पोलीस कर्मचारी भडकला आणि त्याने टेम्पो चालकाला शिव्या दिला. शिवाय त्याला धमकीही दिली. यावर टेम्पोत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने हे तुम्हाला शोभत नसल्याचं सांगितलं. पोलिसांच्या गणवेशात असं वागणं शोभत नसल्याची जाणीव या तरुणाने पोलिसाला करुन दिली. यावेळी या पोलिसांने या तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केली, या मारहाणीत तरुणाच्या तोंडातून रक्त यायला लागलं. जेव्हा ही घटना स्थानिकांनी पाहिले, तेव्हा ते संतापले आणि या तरुणाच्या मदतीला धावले, त्यातील एकाने पोलिसाला मारहाण केली, ज्यात या पोलीसाची वर्दी फाटली.

पाहा व्हिडीओ:

 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्याने या तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्याला रस्त्यावर पळवत मारहाण केली. या झटापटीत पोलिसाचा गणवेश फाटला. दरम्यान, माहिती मिळताच, स्थानिक बीट मार्शलने यांना वाचवलं, त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले. पण संधी पाहून हा आरोपी कॉन्स्टेबलही घटनास्थळावरुन पळून गेला. काही प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल झाला. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तिथं कुणीही नव्हतं. आतापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. व्हायरल व्हिडिओच्या आधारावर घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं अलीगड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा:

तुम्ही कधी चिंपांझीला कपडे धुताना पाहिलं आहे का ? पाहा सोशल मीडियावरील भन्नाट व्हिडीओ

Photo : 1860 मध्ये बांधकाम, 161 वर्ष जुनं, भारतातील एकमेव फ्लोटिंग चर्च, वाचा कधीही न वाचलेली माहिती!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.